TamilNadu : विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू!

131
TamilNadu : विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू!
TamilNadu : विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू!

तामिळनाडूच्या (TamilNadu) कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे 60 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी याला दुजोरा दिला आहे. (TamilNadu)

(हेही वाचा –Vasai Murder Case: पीडित मुलीच्या आईने न्यायासाठी केली याचना; म्हणाली “मुझे मेरी बेटी की जान…”)

कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी जिल्ह्यातील सरकारी मेडीकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली. याप्रकरणी के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे 200 लीटर अवैध दारूची चाचणी केली असता त्यात प्राणघातक ‘मेथनॉल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले असून अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत. स्टॅलिन यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हणाले की, “कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला आणि दु:ख झाले. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरपणे आळा घालण्यात येईल. (TamilNadu)

(हेही वाचा –Ravindra Waikar यांना शपथ देऊ नये; Lok Sabha Secretary यांना उमेदवाराने पाठवली नोटीस)

यासोबतच तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी देखील मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि उपचाररत लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. राज्याच्या विविध भागांतून विषारी दारूच्या सेवनामुळे सातत्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांवर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. (TamilNadu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.