गेल्या काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांच्या (Tamil Nadu Bus Accident) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच आता पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडू येथे ५९ प्रवासी असलेली बस दरीत कोसळली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीनुसार, शुक्रवार २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी तामिळनाडूच्या (Tamil Nadu Bus Accident) निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे हा भीषण अपघात घडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही एक पर्यटक बस होती. या बसमध्ये एकूण ५९ प्रवासी होती. ही पर्यटक बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात होती. मात्र, बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस एका खोल दरीत कोसळली, आणि भीषण अपघात (Tamil Nadu Bus Accident) घडला.
(हेही वाचा – Kokan Railway : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत)
या अपघातातील जखमींवर (Tamil Nadu Bus Accident) सध्या उपचार सुरु आहेत. या बसमधील पर्यटक उटी फिरून परतत असतांना हा भीषण अपघात घडला. स्थानिक पोलीस या सर्व प्रकारची अधिक चौकशी करत आहेत.
Tamil Nadu: 8 killed, several injured as tourist bus falls into gorge near Marapalam
Read @ANI Story | https://t.co/OSR9JnPrB6#TamilNadu #Marapalam #accident pic.twitter.com/4KPOhEF2A5
— ANI Digital (@ani_digital) September 30, 2023
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या अपघातातील (Tamil Nadu Bus Accident) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ८ लाख रुपये, आणि गंभीर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community