मदुराई (Madurai) येथील एका महाविद्यालयीन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगून तामिळनाडूचे (Tamil Nadu) राज्यपाल आरएन रवी (R. N. Ravi) यांनी वाद निर्माण केला आहे. दि. १४ एप्रिल रोजी मदुराई (Madurai) येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आरएन रवी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी विद्यार्थ्यांना घोषणा देण्यास सांगितले. त्यावर वाद निर्माण झाला आहे.
( हेही वाचा : शिवसेना उबाठाला सत्तेत यायचंय, पण…; Chandrakant Patil यांचा दावा)
तामिळनाडूच्या (Tamil Nadu) राज्यपालांचा हा व्हिडिओ व्हायरल होताच सर्व पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे, असे म्हटले आहे. तामिळनाडू स्टेट कॉमन स्कूल सिस्टम फोरम (Tamil Nadu State Common School System Forum) ने त्यांच्यावर संवैधानिक शपथेचे उल्लघंन केल्याचा आरोप केला आहे आणि त्यांना पदावरून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्टेट कॉमन स्कूल सिस्टम फोरमच्या सदस्यांना पोटशूळ झाल्याची चर्चा आहे.
वेलाचेरी येथील काँग्रेस आमदार जेएमएच हसन मौलाना (Hasan Maulana) म्हणाले की, आरएन रवी (R. N. Ravi) हे संवैधानिक पदावर आहेत. अशी कामे त्यांना शोभत नाहीत. रवी एखाद्या धार्मिक नेत्यासारखे बोलत आहेत. ते संघ आणि भाजपचे प्रचार गुरु बनले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. (R. N. Ravi)
तामिळनाडू (Tamil Nadu) स्टेट युनिफॉर्म स्कूल सिस्टीम फोरमने राज्यपाल रवी यांच्यावर तामिळनाडूच्या शैक्षणिक रचनेबद्दल आणि सांस्कृतिक संदर्भाबद्दल अनभिज्ञ असल्याचा आरोपही केला. राज्यपाल रवी (R. N. Ravi) यांना तामिळनाडूतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पाळल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाची माहिती नाही, अशी टीकाही त्यांच्यावर करण्यात आली. त्यांच्या अज्ञानामुळे आणि अहंकारामुळे, ते शांतता भंग करण्याच्या आणि एका गटाला दुसऱ्या गटाविरुद्ध भडकवण्याच्या उद्देशाने चुकीच्या कल्पनांचा प्रसार करत राहता, असे ही राज्यपालांबद्दल बोलण्यात आले. त्यामुळे हिंदूंची श्रद्धास्थाने आणि देवीदेवतांचा द्वेष करण्यातच तामिळनाडू राज्यसरकार आणि तामिळनाडू स्टेट युनिफॉर्म स्कूल सिस्टीम फोरमचे (Tamil Nadu State Common School System Forum) कार्यकर्ते करत आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community