-
प्रतिनिधी
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी वाद वाढत असताना, रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनेनंतर रुग्णालयाच्या हलगर्जीपणावरून राज्यभर संताप व्यक्त होत असून, सरकारने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. घैसास यांनी हा निर्णय घेतला असून, त्यांनी आपला राजीनामा रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. (Tanisha Bhise Death)
(हेही वाचा – “तनिषा भिसेंना ५ तास रक्तस्राव, योग्य ते उपचार दिले नाहीत म्हणून…” ; Rupali Chakankar यांच्याकडून धक्कादायक खुलासे)
तनिषा भिसे या गर्भवती महिलेला २९ मार्च २०२५ रोजी प्रसूतीसाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वी १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप भिसे कुटुंबीयांनी केला होता. पैशांची व्यवस्था न झाल्याने तनिषाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे प्रसूतीदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली असून, रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. (Tanisha Bhise Death)
(हेही वाचा – World Health Day निमित्त PM Narendra Modi यांनी दिला महत्त्वाचा सल्ला !)
चौकशी अहवालात रुग्णालयाच्या हलगर्जीपणाला कारणीभूत ठरवल्याने डॉ. घैसास यांच्यावर दबाव वाढला होता. त्यांच्यावर उपचारापूर्वी पैसे मागितल्याचा गंभीर आरोप होता. या घटनेनंतर आंदोलने आणि टीकेचा भडिमार झाल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला. रुग्णालय प्रशासनाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Tanisha Bhise Death)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community