देशात नवीन वाहन कायदा येणार आहे. या कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी संप पुकारला आहे. (Tanker Drivers Strike) त्यामुळे देशभरात पेट्रोल-डिझेलची चणचण जाणवू लागली आहे. राज्यातील पेट्रोलची अडचण सोडवण्यासाठी मनमाड डेपोतून इंधनाचे टँकर निघावे, यासाठी बैठका सुरु होत्या. अखेर या हालचालींना यश आले आहे. मंगळवार, २ जानेवारी रोजी मनमाड (Manmad) येथे जिल्हाधिकाऱ्यांनी टँकर चालक (Tanker driver), मालक यांची बैठक घेतली. त्यात तोडगा निघाला आहे.
(हेही वाचा – DCM Ajit Pawar : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वय वाढवावा)
टँकरला पोलीस संरक्षण देणार
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) म्हणाले की, राज्यातील पेट्रोलपंपांना होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. मनमाड येथील एचपीसीएल (HPCAL), बीपीसीएल (BPCAL), इंडीयन ऑईल (Indian Oil) आणि गॅस प्लँटमधून गरज पडल्यास बंदोबस्तात टँकर रवाना होणार आहे. पेट्रोल आणि डिझेल ही जीवनावश्यक बाब आहे. याविषयी चर्चा झाल्यानंतर टँकर चालकांनी संपातून माघार घेण्याची तयारी दर्शवली. या वेळी गरजेनुसार टँकरला पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. (Tanker Drivers Strike)
(हेही वाचा – Truck Driver Strike : ट्रकचालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांचा स्कूल बस चालकांना इशारा; म्हणाले,…)
१५०० वाहनांतून वाहतूक चालू होणार
येत्या काही तासांत मनमाड डेपोतून टँकर रवाना होणार आहे. बैठकीत जिल्हाधिकारींनी चालकाच्या समस्या सोडवण्यास तयार दर्शवली. मनमाड येथील इंधन आणि गॅस प्रकल्पातून वाहतूक करणारी १५०० वाहने थांबली होती. त्यांची वाहतूक आता चालू होणार आहे. मनमाडहून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अन् खानदेशात इंधन पुरवठा केला जातो. टँकर बाहेर न पडल्याने टंचाई निर्माण झाली. आता ही सेवा सुरळीत सुरु होणार आहे. (Tanker Drivers Strike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community