-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर (Tanker) चालकांनी मागील चार दिवसांपासून पुकारलेला संप अखेर महापालिका आयुक्त तथा प्रशासकांसोबत झालेल्या सकारात्मकरित्या झालेल्या बैठकीनंतर टँकर मालकांनी मागे घेतला. महापालिका आयुक्त तथा प्रशासकांनी टँकर मालकांचे म्हणणे ऐकून घेत यापूर्वी जारी करण्यात आलेल्या नोटीसना स्थगिती देण्यात येईल आणि त्या मागे घेण्यात येतील अशाप्रकारचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर टँकर मालकांनी हा संप मागे घेण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती मिळत आहे.
(हेही वाचा – West Bengal चा होणार दुसरा काश्मीर; मुर्शिदाबादमधून हिंदूंचे सुरु झाले पलायन)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशानंतर मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली. मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिशींना १५ जून २०२५ पर्यंत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी स्थगिती दिली. तरीही टँकर (Tanker) मालकांनी संप कायम ठेवला आहे, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रमाणित कार्यपध्दती जारी करत आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित अर्थात ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित केली आहे.
(हेही वाचा – Dr. Babasaheb Ambedkar यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन)
त्यामुळे महापालिकेने टँकर (Tanker) मालकांचे नाक तोंड बंद करताच वॉटर टँकर मालक असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी आयुक्तांच्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी, टँकर मालकांना नियमावलीबाबतची माहिती देत या नियमांचे पालन करणे महापालिकेचे कर्तव्य असल्याचे सांगत आपणही नियमांचे पालन केल्यास महापालिकेने कार्यवाही करण्यची वेळ येणार नाही. त्यामुळे नियमावलीत बदल करण्यासाठी आपणही प्रयत्न करावे. तोपर्यंत महापालिका प्रशासनाने नोटीसबाबत स्थगिती दिली आहे. तसेच विहिर अधिग्रहीत करण्याची कार्यवाहीही मागे घेतली जाईल असे सांगितल्यानंतर सकारात्मक चर्चेनंतर टँकर मालकांनी संप मागे घेण्याची तयारी दर्शवत याची घोषणा केल्याची माहिती मिळत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community