मुंबई महानगराची जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख ७ तलावांपैकी तुळसी पाठोपाठ आता तानसा तलाव व विहार तलावही बुधवारी (२६ जुलै) सकाळी पहाटेच्या सुमारास ओसंडून वाहू लागले. त्यामुळे आता लवकरच मोडक सागर भरून वाहू लागेल,असा अंदाज आहे. पण विहार तलाव लवकर भरल्याचा आनंद होत असला तरी एका प्रकारे मुंबईकरांच्या चिंतेत भर पडणारी बाब आहे. त्यामुळे इथून पुढे मुंबई महापालिकेची कसोटी लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा लाख दशलक्ष लीटर एवढी आहे. सध्या या सर्व धरणात ५८.९३ टक्के अर्थात ८ लाख ५२ हजार ९५७ दशलक्ष लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे.
(हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार राजस्थान आणि गुजरातचा दौरा)
यापूर्वी तुळसी तलाव मागील आठवड्यात भरले होते. त्यानंतर विहार तलाव मध्यरात्री तर तानसा धरण हे पहाटे पाच च्या सुमारास ओसंडून भरून वाहू लागले. आता प्रतीक्षा आहे मोडक सागर धरणाची. हे धरण ८७.६९ टक्के एवढे भरले असून पावसाचा असाच जोर राहिल्यास पुढील तीन दिवसात हे धरण भरून वाहू शकेल असा अंदाज आहे.
विहार तलाव भरल्याने आता मुंबई महापालिकेची खरी कसोटी पाहायला मिळणार आहे. विहार धरणाचे पाणी हे मिठी नदीला येऊन मिळते. त्यामुळे मिठी नदीची पातळी वाढत जाऊन मुसळधार पावसात अनेक भागांमध्ये जलमय होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.त्यामुळे विहार तलाव लवकर भरल्याचा एक प्रकारे आनंद वाटत असला तरीही मुंबईकरांच्या चिंतेत भर पाडणारी ही घटना आहे, असे बोलले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community