Indian Railway च्या रुळांना लक्ष्य करा; पाकिस्तानातील दहशतवादी फरहातुल्ला घोरीची चिथावणी 

188

देशात गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वेगाड्या (Indian Railway) रूळावरून घसरल्याने अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांत रेल्वे रूळांवर दगड आणि लोखंडी साहित्य ठेवण्यात आल्याच्या घटनाही उघडकीस आल्या होत्या. यामागे घातपात असल्याचा संशय असतानाच पाकिस्तानातील जिहादी दहशतवादी फरहातुल्ला घोरी याचा १२ मिनिटांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात त्याने दहशतवाद्यांना (‘स्लीपर सेल’)ना भारतीय रेल्वे, इंधन आणि जल वाहिन्या (पाईपलाईन), पोलीस आणि हिंदूंचे नेते यांना लक्ष्य करा, अशी चिथावणी दिली आहे.

रेल्वेमार्गांची तोडफोड करावी

घोरी हा सध्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या सूचनेनुसार तेथे राहून भारताविरुद्ध कट रचत आहे. या व्हिडिओमध्ये ‘रेल्वेमध्ये (Indian Railway) वेगवेगळ्या प्रकारे स्फोट कसे घडवून आणले जाऊ शकतात?, हे घोरी सांगत आहे. यासाठी त्याने ‘प्रेशर कुकर’सारख्या वस्तूंपासून बाँब बनवण्याची कल्पनाही मांडली आहे. दहशतवादी घोरी व्हिडिओमध्ये म्हणतो की, भारत सरकारने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि अंमलबाजवणी संचालनालय यांच्या माध्यमातून आमच्या लोकांची मालमत्ता जप्त केली आहे. बँक खाती सील केली जात आहेत. यासह आमच्या मालमत्तेवर नियमितपणे बुलडोझर चालवला जात आहे.

(हेही वाचा Congress Survey : उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नाला तिलांजली)

अशा परिस्थितीत भारत सरकारला सडेतोड उत्तर देणे आवश्यक आहे. या सडेतोड प्रत्युत्तरातून त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधावा, आर्थिक साखळी आणि पुरवठा साखळी यांना लक्ष्य करून रेल्वेमार्गांची (Indian Railway) तोडफोड करावी. यासाठी आधी तुम्हाला स्वत:ला उभे रहावे लागेल, त्यानंतर अनेक पथके तुम्हाला साथ देण्यासाठी तयार होतील. केवळ शस्त्रे उचलणे आवश्यक नाही, तर इतर मार्गांनीही भारताचे नुकसान होऊ शकते. पथकात नव्याने प्रवेश करणार्‍यांचा बुद्धीभेद करा आणि त्यांचा तुमच्या कामासाठी वापर करून घ्या. अन्वेषण यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाहीत, यासाठी प्रत्येक पथकाने आपापल्या पद्धतीने काम केले पाहिजे. फरहातुल्ला घोरी याने रेल्वे आणि प्रशासकीय व्यवस्था यांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त हिंदूंचे नेते आणि पोलीस यांच्या हत्या करण्याचेही आतंकवाद्यांना सांगितले आहे. यासाठी नवीन पद्धतीचा अवलंब करण्यास सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे रुळ आणि रूळांवर चाकू घेऊन चालणारा तरुण दिसत आहे. एक व्यक्ती पिस्तूलमध्ये गोळ्या भरतांना दिसत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.