Tariff War Fear : व्यापारी युद्धाच्या भीतीमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात अभूतपूर्व पडझड

63
ऋजुता लुकतुके

एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा शेअर बाजारात अभूतपूर्व घसरण घेऊन आला आहे. सव्वानऊ वाजता शेअर बाजार उघडतात निफ्टी (Nifty) आणि सेन्सेक्स (Sensex) या दोन संवेदनशील निर्देशांकांनी मान टाकली आहे. (Tariff War Fear) आणि सुरुवातीच्या तासाभरातच निफ्टीत साधारण १००० अंशांची आणि सेन्सेक्समध्ये ३,००० अंशांची घसऱण दिसून येत आहे. कोव्हिड काळानंतर शेअर बाजारात झालेली ही पहिली इतकी मोठी पडझड आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी  एप्रिलला भारतासह काही देशांवर आयात शुल्क वाढ लागू केल. यात चीनकडून येणाऱ्या मालावर अमेरिका ३४ टक्के आयात शुल्क आकारणार आहे. तर भारताकडून आयात होणाऱ्या मालावर २६ टक्के इतकं शुल्क लावण्यात आलं आहे.

(हेही वाचा – ट्रम्प-मस्क यांच्या धोरणांच्या विरोधात १२०० मोर्चे; अमेरिकेत होत आहे Hands Off Protests)

भारताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी चीनने तातडीने अमेरिकेतून आलेल्या मालावर ३४ टक्के आयात शुल्क लागू केलं आहे. तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यातही थांबवली आहे. चीनच्या या जशास तसे भूमिकेमुळे जगभरात पुन्हा एकदा व्यापारी युद्धाची भीती जाणवू लागली आहे. तर चीनच्या मागोमाग कॅनडाही तशीच भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. तर डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी आपल्या आयात शुल्क धोरणाचं समर्थनच केलं आहे. त्यामुळे व्यापारी युद्धाचे ढग गडद झाल्याचं चित्र आहे. त्याचाच परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे.

टाटा मोटर्स समुहाच्या (Tata Motors Group) मालकीची कंपनी जॅग्वार – लँडरोव्हरने आपल्या गाड्यांची अमेरिकेला होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये सर्वाधिक पडझड झाली आहे. हा शेअर ९ टक्क्यांनी खाली आहे. तर धातू उद्योगाशी संबंधित शेअरही मंदीच्या वातावरणात आहे. शेअऱ बाजारातील दिग्गज शेअर समजला जाणारा रिलायन्स आणि टीसीएसही खाली आहे. सगळ्याच क्षेत्राला मंदीचा तडाखा बसला आहे. (Tariff War Fear)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.