Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोडून इतर देशांची आयात शुल्क वाढ का थांबवली? पाहूयात ३ कारणे

Tariff War : ट्रम्प यांनी इतर देशांची शुल्क वाढ ९० दिवसांसाठी स्थगित केली.

89
Tariff War : डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोडून इतर देशांची आयात शुल्क वाढ का थांबवली? पाहूयात ३ कारणे
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी चीन व्यतिरिक्त इतर देशांवर २ एप्रिलला लागू केलेली आयात शुल्क वाढ ९० दिवसांसाठी सध्या स्थगित केली आहे. उलट चीनवरील आयात शुल्क मात्र १२५ टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे. याआधी त्यांनी चीनवर १०४ टक्के आयात शुल्क लादलं होतं. ‘चीनने जागतिक बाजारात घडलेल्या घडामोडींचा आदन केलेला नाही. उलट इतर देशांनी अमेरिकेबरोबर वाटाघाटींची तयारी दाखवली आहे,’ असं ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केलं.

एकूण ७५ देशांनी अमेरिकेबरोबर वाटाघाटी सुरू करण्याची तयारी दाखवली आहे. (यात भारताची समावेश आहे) या वाटाधाटींसाठी वेळ दिला जाईल. जोपर्यंत आयात शुल्क वाढ स्थगित असले त्या काळात या देशांवर १० टक्के इतकं आयात शुल्क लागू होईल, असं ट्रम्प प्रशासनाने जाहीर केलं आहे. (Tariff War)

(हेही वाचा – Tahawwur Rana च्या हातात-पायात बेड्या, कंबरेत साखळी ; अमेरिकेने एनआयएकडे सोपवतानाचा पहिला फोटो आला समोर)

ट्रम्प यांनी घाई घाईने हा निर्णय का घेतला याची ३ महत्त्वाची कारणं पाहूया : 

अमेरिकन शेअर बाजारातून आयात शुल्क वाढीला होत असलेला विरोध : अमेरिकेत अगदी रिपब्लिकन पक्षाचे गुंतवणूकदारही ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमकतेला घाबरले आहेत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे जगभरात व्यापारी युद्धाचा भडका उडेल अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून घ्यायला सुरुवात केली. सलग दोन दिवस जागतिक आणि त्याचबरोबर अमेरिकन बाजार ५ – ५ टक्क्यांनी कोसळले. तसंच बाँड बाजारातही अभूतपूर्व पडझड झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी ट्रंप प्रशासनाने सध्या ही आयात शुल्क वाढ स्थगित केली आहे.

चीनची कोंडी : आयात शुल्कवाढ करताना चीनची कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिसतो आहे. इतर देशांवरही आयात शुल्क वाढलं असतं तर चीनबरोबर कॅनडा आणि युरोपातील काही देश गेले असते. त्यातून व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची शक्यता होती. पण, आता चीन काहीसा एकटा पडला आहे. त्यांनी अमेरिकेवर तितकंच आयात शुल्क लागू केलं. दोन देशांदरम्यान व्यापारी युद्ध सुरू झालं आहे आणि अमेरिकेचं चीनची कोंडी करण्याचं धोरणच यातून पुढे येत आहे. (Tariff War)

(हेही वाचा – ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत मिळणार)

इतर देशांबरोबर वाटाघाटी सुरू : अमेरिकेनं २ एप्रिल या अमेरिकन मुक्ती दिनाच्या दिवशी आयात शुल्क वाढ लागू केली. तेव्हाही काही देशांबरोबर अमेरिकेच्या व्यापारी वाटाघाटी सुरू होत्या. भारताचं एक पथकही त्या दरम्यान अमेरिकेत होतं. तसंच युरोपातील जवळ जवळ सगळ्या देशांनी वाटाघाटी करण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे या व्यापारी वाटाघाटींना वेळ मिळावा, यासाठी ट्रम्प यांनी तूर्तास आयात शुल्कवाढ स्थगित केली आहे.

दुसरीकडे, भारताने या कालावधीत अमेरिकेबरोबरच्या कराराला मूर्त स्वरुप देण्याबरोबरच भविष्याची तरतूद म्हणून युरोपीयन देशांबरोबर तसंच युरोपीयन युनियनमधून बाहेर पडलेल्या युनायडेट किंग्डमबरोबर सहकार्य करार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याचबरोबर चीनचा अमेरिकेत न जाणारा माल आता ते इतर देशांमध्ये पाठवू शकतात. ते करताना दर्जाची काळजीही चीनकडून घेतली जात नाही, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे खासकरून चीनकडून येणाऱ्या मालावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. (Tariff War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.