कोळशाच्या टंचाईमुळे आता नागरिकांना बसणार शाॅक!

146

वाढत्या उकाड्यामुळे वीजेची मागणी वाढली आहे. वाढत्या वीज मागणीमुळे कोळसा महाग झाल्याने त्याचा फटका येत्या काळात बसण्याची शक्यता आहे. इंधन समायोजन आकार’ म्हणून असलेल्या शुल्कात वाढ होऊन महागड्या विजेचे बिल मुंबईकरांना भरावे लागणार आहेत.

त्यामुळे वीज महागण्याची शक्यता

मागच्या वर्षी ऑगस्टनंतर देशभरात कोळसा टंचाई झाली होती. त्यामुळे मुंबईला वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आयात करावा लागला. या आयातीत कोळशाचे दर स्वदेशी कोळशापेक्षा 200 टक्के अधिक होते. त्यामुळेच ‘इंधन समायोजन आकार’ अंतर्गत दरवाढ करण्याची तयारी वीज वितरण कंपन्यांनी केली होती. परंतु कोरोना संकटामुळे हा आकार वसूल करण्यावर महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मार्च 2022पर्यंत निर्बंध लावले होते. आता 1 एप्रिलपासून हा आकार लावून दरवाढ करण्याची मुभा वीज वितरण कंपन्यांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईतील तिन्ही वीज वितरण कंपन्यांची वीज महागण्याची दाट चिन्हे आहेत.

( हेही वाचा: भविष्यात नाना पटोलेंच्या घरावरही ईडीच्या धाडी! काय म्हणाले राऊत? )

त्यामुळे लवकरच वाढणार किंमती

मुंबईला तीन कंपन्या वीज वितरण करतात. 30 लाख ग्राहकांसाठी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड कंपनी त्यांच्या 500 मेगावाॅट क्षमतेच्या डहाणू प्रकल्पात 802 टक्के देशांतर्गत कोळसाच वापरला जातो. 20 टक्के आयातीचा कोळसा वापरल्याने त्यांचा खर्च वाढला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 2020-21 ते 2024-25 या पंचवार्षिक दर निश्चितीवेळी टाटा पॉवरने कोळशापोटी जवळपास 6,800 रुपये प्रति टन खर्चास मंजुरी दिली होती. पण एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान टाटा पॉवरला सरासरी 9 ते 10 हजार रुपये प्रति टन दराने कोळसा खरेदी लागला. एईएमएलला 5800 रुपये प्रति टन खर्च मंजूर करण्यात आला होता. त्यांचा सरासरी कोळसा खर्च जवळपास तेवढाच राहिला. यामुळे लवकरच टाटा पॉवरकडून 1.10 रुपये तर एईएमएलकडून 25 पैसे प्रति युनिट इतकी दरवाढ होऊ शकते, असे एका अहवालातून समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.