टाटा समूहाने आता विमान निर्मितीसाठी एअरबसशी करार (Tata-Airbus Deal) केला आहे. हा करार देशात एक इंजिन असलेली हेलिकॉप्टर्स आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.
या वर्षी होणार शुभारंभ –
या कराराचा (Tata-Airbus Deal) एक भाग म्हणून, गुजरातमधील वडोदरा येथे अंतिम असेंब्ली लाइन उभारली जाईल, जिथे टाटा समूह आणि एअरबस संयुक्तपणे एअरबसच्या एच १२५ सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची निर्मिती करतील. हा मार्ग ३६ एकरांवर बांधण्यात येणार आहे. ते २०२४ च्या मध्यापर्यंत तयार होईल आणि नोव्हेंबर २०२४ पासून कार्यरत होईल.
(हेही वाचा – Ayodhya Ram mandir : जेव्हा राम मंदिरात उद्योगपती श्रीधर वेंबू यांच्या आईचं पाकीट हरवतं…)
विमानाचे काही भाग हैदराबादमधील एअरबसच्या (Tata-Airbus Deal) मुख्य घटक असेंब्ली लाइनवर तयार केले जातील. तेथून, सुटे भाग वडोदराला पाठवले जातील आणि वडोदरा येथील असेंब्ली लाईनमधील सुटे भागांमधून विमान तयार केले जाईल. करारानुसार, वडोदरा येथील असेंब्ली लाइनवर किमान ४० सी २९५ वाहतूक विमानांची निर्मिती केली जाईल.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीरनामा –
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त या कराराची घोषणा केली. प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी भारत आणि फ्रान्सने संरक्षण-औद्योगिक आराखडा आणि संरक्षण-अंतराळ भागीदारीवर सहमती दर्शवली आहे. टाटा आणि एअरबस यांच्यातील करार (Tata-Airbus Deal) या परस्पर करारांतर्गत करण्यात आला आहे.
(हेही वाचा – Yashasvi Jaiswal : …आणि यशस्वी जयसवालवर राहुल द्रविडने दाखवलेला विश्वास सार्थ ठरला!)
हेलिकॉप्टर्सची निर्यातही केली जाईल
भारतातील खाजगी क्षेत्रातील ही पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असेल. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, या सुविधेमध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एअरबस एच १२५ सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन असेल. एअरबसच्या सहकार्याने या सुविधेत तयार केल्या जाणाऱ्या एच १२५ सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरचा वापर भारतात केला जाईल तसेच निर्यातही केली जाईल. (Tata-Airbus Deal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community