Tata Charging Station: प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारणार; जाणून घ्या ‘या’ दोन कंपन्यांसोबत झाला करार

119
Tata Charging Station: प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारणार; जाणून घ्या 'या' दोन कंपन्यांसोबत झाला करार
Tata Charging Station: प्रमुख शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारणार; जाणून घ्या 'या' दोन कंपन्यांसोबत झाला करार

भारतात इंधनावरील किंमती दिवसेंदिवस आकाशाला भिडत चालल्या आहेत. परिणामी याचा फटका सर्वसामान्य वाहन चलकांना बसत आहे. याच इंधनाला पर्याय म्हणून भारतभरात इलेक्ट्रिक वाहनांचा प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी TATA Motors ने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे (EVs) चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडिया (Delta Electronics India) आणि थंडरप्लस सोल्युशन्स (Thunder Plus Solutions), या दोन आघाडीच्या कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांना (Electric vehicle) अधिक सोयीस्कर आणि सुलभ बनवणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.  (Tata Charging Station)

गेल्या काही काळापासून टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. कंपनीच्या या भागीदारीअंतर्गत देशभरात 540 फास्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे EV मालकांना चार्जिंगसाठी अधिक पर्याय मिळू शकतील आणि कोणत्याही त्रासाशिवाय लांब पल्ल्याचा प्रवास करू शकतील.   (Tata Charging Station)

(हेही वाचा – jana waterfall manali: मनालीमध्ये फिरायला जाणार आहात? मग ‘या’ फेमस धबधब्याला नक्की भेट द्या)

असा फायदा मिळेल

टाटा मोटर्सचे हे पाऊल देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. तसेच, चार्जिंग सुविधा सहज उपलब्ध झाल्यास अधिकाधिक लोक इलेक्ट्रिक वाहने विकत घेतील. यामुळे प्रदूषण तर कमी होईलच, पण देशाची ऊर्जा सुरक्षाही वाढेल. याव्यतिरिक्त, टाटा मोटर्सने हे देखील स्पष्ट केले आहे की, ते आगामी वर्षांत आणखी नवीन ईव्ही मॉडेल्स लाँच करण्यासाठी आपल्या ईव्ही पोर्टफोलिओचा विस्तार करणार आहेत.   (Tata Charging Station)

हेही पाहा –

https://youtu.be/ssPTs1tylog?si=py3wrQFwwOgC4Xrk

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.