Tata Haldiram Deal : टाटा समुहाचा हलदीराम विकत घेण्याचा प्रयत्न?

हा करार पार पडला तर टाटा समुह पेप्सी आणि रिलायन्स या देशातील आघाडीच्या ग्राहकोपयोगी ब्रँडशी थेट स्पर्धा करेल.

238
Tata Haldiram Deal : टाटा समुहाचा हलदीराम विकत घेण्याचा प्रयत्न?
Tata Haldiram Deal : टाटा समुहाचा हलदीराम विकत घेण्याचा प्रयत्न?
  • ऋजुता लुकतुके

टाटा समुहाने हलदीराम हा स्नॅक्स ब्रँड विकत घेण्याची तयारी चालवली आहे. आणि हा करार पार पडला तर टाटा समुह पेप्सी आणि रिलायन्स या देशातील आघाडीच्या ग्राहकोपयोगी ब्रँडशी थेट स्पर्धा करेल. टाटा समुहाच्या रिटेल उद्योग विभागाने हलदीराम कंपनीशी बोलणी सुरू केल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं एका बातमीत म्हटलं आहे. हलदीराम कंपनीचा ५१ टक्के हिस्सा विकत घेण्याची टाटा समुहाची इच्छा आहे. पण, सध्या हलदीराम कंपनीचं मूल्यांकन १० अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचं हलदीरामचं म्हणणं आहे. आणि ते टाटा समुहाला जास्त वाटतंय.

चर्चेला आता कुठे सुरुवात झाली आहे. आणि येणाऱ्या दिवसांत ही चर्चा करारात बदलली, तर टाटा समुह हा रिटेल क्षेत्रात अंबानींचा रिलायन्स रिटेल आणि पेप्सीको या दोन कंपन्यांशी थेट स्पर्धा करेल. हलदीराम हा ब्रँड भारतात खूप मोठा आहे. आणि हे घराघरात पोहोचलेलं नाव आहे. त्यांनाही रोखतेसाठी आपला काही हिस्सा विकायचा आहे. आणि त्यासाठी बेन कॅपिटल्स या कंपनीशी ते बोलणी करत आहेत, असंही रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. बेन कॅपिटल्स बरोबरची बोलणी हलदीरामच्या १० टक्के हिस्सेदारीसाठी आहेत.

टाटा समुहाकडे सध्या युकेतील एक चहा कंपनी टिटले टी कंपनीची हिस्सेदारी आहे. तसंच भारतात स्टारबक्स या कॉफी हाऊसचं वितरणही टाटा कंपनी करते. पण, हलदीरामबरोबरचा करार प्रत्यक्षात आला तर टाटा समुह खऱ्या अर्थाने रिटेल क्षेत्रात उतरेल. भारतात टाटा कंपनीची ओळख चहा आणि कॉफी बनवणारी कंपनी म्हणून आहे. पण, आता टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स या कंपनीचा विस्तार टाटा समुहाला करायचा आहे. इतकंच नाही तर या कंपनीचा आयपीओही बाजारात आणण्याची तयारी सुरू आहे. अशावेळी हलदीरामची ५१ टक्के हिस्सेदारी विकत घेण्याची खेळू टाटा समुहासाठी खूप महत्त्वाची आहे. सध्या टाटा कंपनीने हलदीरामने कोट केलंलं १० अब्ज अमेरिकन डॉलरचं मूल्यांकन जास्त असल्याचं त्यांना कळवलं आहे.

(हेही वाचा – Sugar Factories : साखर कारखान्यांना आता राज्य सरकार कर्ज हमी देणार)

हलदीराम ब्रँड हा देशातील स्नॅक्स उद्योगातला एक महत्त्वाचा ब्रँड आहे. १९३७ मध्ये छोटी दुकानं आणि किराणा मालाच्या दुकानात हलदीराम भुजिया नावाने एक शेवेचा प्रकार विकला जायचा. हे हलदीरामचं पहिलं उत्पादन. पण, तिथून संस्थापक चुतानी घराण्याने वेगवेगळ्या प्रकारच्या शेव, कचोरी, चिवडा अशी उत्पादनं वाढवत नेली. आणि आज स्नॅक्स उत्पादनात हलदीरामचा वाटा १३ टक्क्यांहून जास्त आहे. विशेष म्हणजे लेज् चिप्ससाठी प्रसिद्ध असलेली पेप्सीको कंपनीचा देशातील वाटाही १३ टक्केच आहे. म्हणजेच हलदीराम ही या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. तर रिलायन्सने आताच या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. हलदीराम कंपनी आपल्या स्नॅक्स बरोबरच १५० गावांमध्ये छोटेखानी हॉटेल्सही चालवते. शिवाय सिंगापूर आणि अमेरिकेतही कंपनीचा वावर आहे. हलदीराम आणि टाटा समुह यांच्यात बोलणी सुरू आहेत, ही गोष्ट दोन्ही गटांनी नाकारलेली नाही. पण, करार अजून बाल्यावस्थेत आहे, असं दिसतंय.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.