PM CARES च्या विश्वस्तपदी रतन टाटांची नियुक्ती, सुधा मूर्तींना सल्लागार पद

पंतप्रधान सहाय्यता निधी अर्थात PM Cares Fundच्या बोर्ड ऑफ ट्रस्टींमध्ये देशातील नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यांमध्ये नामवंत उद्योगपती रतन टाटा यांची या बोर्डाच्या विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती यांचा या बोर्डाच्या सल्लागार गटात समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि नवनियुक्त विश्वस्त रतन टाटा उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

या बैठकीत पीएम केअर फंडासाठी भारतीय नागरिकांनी दिलेल्या योगदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक करण्यात आले. तसेच या निधीच्या माध्यमातून सरकारकडून राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देखील यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली. पीएण केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेच्या माध्यमातून 4 हजार 345 मुलांना मदत करण्यात आली आहे. नवीन विश्वस्त आणि सल्लागारांच्या नेमणुकीमुळे पीएम केअर्स फंडाच्या कामाला नवी दृष्टी मिळेल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः 40 महिन्यांत पहिल्यांदाच बँकांमध्ये रोख रक्कमेचा तुटवडा, काय आहे कारण?)

सल्लागारांमध्ये यांचाही समावेश

रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती केटी थॉमस आणि राज्यसभेचे माजी उपसभापती कारिया मुंडा यांचा देखील पीएम केअर्सचे विश्वस्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच सल्लागार सदस्यांमध्ये सुधा मूर्ती यांच्यासह भारताचे माजी महालेखापरीक्षक (कॅग) राजीव महर्शी,इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शहा यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here