Tata Hospital : कॅन्सरवर आयुर्वेदिक औषधांसाठी टाटा हॉस्पिटल संशोधन करणार; ५० एकर जमिनीवर वनस्पतींची लागवड होणार

129

सध्या देशभरात विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर ऍलोपॅथीची औषधे गुणकारी ठरत आहेत, मात्र आयुर्वेदिक औषधे अधिक परिणामकारक ठरू शकतात, म्हणून आता टाटा हॉस्पिटल (Tata Hospital) सध्या या जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु आहे.

कॅन्सरचा प्रभाव कमी करणाऱ्या वनस्पतींच्या लागवडीच्या आणि संशोधनाच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकाने तब्बल ३०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. भारतात दरवर्षी ७ लाख नागरिकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. तर, १० लाख लोकांना कॅन्सरचा आजार होतो. टाटा मेमोरिअल  (Tata Hospital) सेंटरमध्ये दरवर्षी भारतातून ७५ हजार रुग्ण परळ आणि खारगर येथील रुग्णालयात दाखल होतात, असे डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले.

कॅन्सरवरील सध्या उपचारांच्या पद्धतीला पर्यायी पद्धतीचे संशोधन होणे गरजेचे आहे. टाटा हॉस्पिटलने  (Tata Hospital) तीन वर्षांपूर्वी आयुर्वेदिक औषधांचा वापर गर्भाशयाचा कॅन्सर असणाऱ्या रुग्णांसाठी केला होता. याशिवाय केमोथेरेपीच्या औषधांचा रुग्णांच्या प्रकृतीवर होणारा साइड इफेक्ट रोखण्यासंदर्भात आयुर्वेदिक औषधांची क्षमता तापसली जात आहे. याशिवाय पाच वर्षांच्या अभ्यासातून नियमित योगाचा ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे डॉ. बडवे म्हणाले.

(हेही वाचा Khalistan In Canada : कॅनडाच्या गायकाचा मुंबईतील शो रद्द; कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांचा परिणाम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.