१० वी उत्तीर्णांना टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नोकरीची संधी! ४०५ रिक्त जागांसाठी भरती, येथे करा अर्ज

155

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत क्लर्क, अटेंडंड, ट्रेड हेल्पर, नर्स या पदांच्या ४०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२३ आहे.

( हेही वाचा : विलेपार्ले येथे आणखी एक अभ्यासिका : पडिक भूखंडावर उभी राहतेय वास्तू)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – लोअर डिव्हिजन क्लर्क, अटेंडंट, ट्रेड हेल्पर, नर्स
  • पदसंख्या – ४०५ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा –
    लोअर डिव्हिजन क्लर्क – २७ वर्षे ( १८ पदे)
    अटेंडंट – २५ वर्ष ( २० पदे)
    ट्रेड हेल्पर – २५ वर्ष ( ७० पदे)
    नर्स A – ३० वर्ष (२१२ पदे)
    नर्स B – ३५ वर्ष ( ३० पदे)
    नर्स C – ४० वर्ष ( ५५ पदे)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२३
  • निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा
  • अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in

वेतनश्रेणी

  • लोअर डिव्हिजन क्लर्क – १९ हजार ९०० रुपये
  • अटेंडंट – १८ हजार रुपये
  • ट्रेड हेल्पर – १८ हजार रुपये
  • नर्स A – ४४ हजार ९०० रुपये
  • नर्स B – ४७ हजार ६०० रुपये
  • नर्स C – ५३ हजार १०० रुपये
  1. निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी यांचा समावेश असेल.
  2. परीक्षा फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल.
  3. लेखी परीक्षेत मिळालेले गुण गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जातील.
  4. मूळ कागदपत्रे मुलाखत, लेखी परीक्षा व कौशल्य चाचणी दरम्यान सोबत ठेवावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.