- ऋजुता लुकतुके
नावाप्रमाणेच टाटाच्या या शोरुममध्ये फक्त ईव्ही कारच असतील. (Tata Motors EV Store)
टाटा मोटर्स ही देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारी आणि देशात वाहनाचं उत्पादन सुरू करणारी पहिली ऑटोमोबाईल कंपनी आहे. आता एक पाऊल पुढे जात कंपनीने नवी दिल्लीजवळ गुरुग्राम इथं देशातील पहिली फक्त ई-वाहनांसाठी असलेली शोरुम सुरू केली आहे. गुरुग्रामच्या सेक्टर १४ मध्ये सोहाना रस्त्यावर टाटाची ही नवी शोरुम आहे. (Tata Motors EV Store)
An experience shaped by purpose, a world built with love. Say hello to our home of electric —
Welcome to our first #TATAevRetailStore at #Gurugram —
📍Sohna Road
📍Sector 14
.
.#GurugramGoesElectric .#TATAev #MoveWithMeaning pic.twitter.com/DuC9khxgcZ— TATA.ev (@Tataev) December 21, 2023
(हेही वाचा – WFI Election Timeline : ब्रिजभूषण शरण आणि कुस्तीपटूंच्या वादात आतापर्यंत काय काय घडलं?)
निसर्गाचा सांभाळ, समाजाचं हित आणि आधुनिक तंत्रज्ञान हा टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन मोहिमेचा गाभा आहे. या शोरुममध्येही ही मूल्य जागोजागी पाहायला मिळतात. सध्या टाटा मोटर्सचे १ लाखांच्या वर ग्राहक आहेत. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना हवं ती सेवा एका जागी मिळावी यासाठी ही शोरुम सुरू केल्याचं टाटा मोटर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले. (Tata Motors EV Store)
देशात इलेक्ट्रिक वाहनं चालणाऱ्या समाजाला एकत्र आणावं हा कंपनीचा उद्देश आहे. येत्या १२ ते १८ महिन्यात देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये टाटा डॉट इव्हीच्या फ्रँचाईजी उभ्या राहणार आहेत. (Tata Motors EV Store)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community