Tata Motors ने लावली एक दशलक्षहून अधिक झाडे; महाराष्‍ट्रातील आदिवासी भागांमधील हरित आच्‍छादनामध्‍ये वाढ

पालघर जिल्‍ह्यातील पूर्वीच्‍या १३,००० एकर ओसाड जमिनीला हरित आच्‍छादनामध्‍ये आणले. जैवविविधतेचे जतन करण्‍यासाठी आणि शेतकऱ्यांमधील स्‍थलांतराचे प्रमाण कमी करण्‍यासाठी पुढील ३ महिन्‍यांमध्‍ये अतिरिक्‍त एक दशलक्ष झाडे लावणार. 

118
Tata Motors ने लावली एक दशलक्षहून अधिक झाडे; महाराष्‍ट्रातील आदिवासी भागांमधील हरित आच्‍छादनामध्‍ये वाढ

महाराष्‍ट्रातील आदिवासी भागांमध्‍ये टाटा मोटर्सने (Tata Motors) परिवर्तनात्‍मक मिशन-एक दशलक्ष वृक्षारोपण उपक्रम सुरू केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्‍पाचा पालघर जिल्‍ह्यातील स्‍थानिक समुदायांसाठी आशेचे रोपटे पेरण्‍याचा मनसुबा आहे. आजपर्यंत, आठ ब्‍लॉक्‍समधील १३,००० एकर जमिनीवर १.५ दशलक्ष फळे व वन रोपांची लागवड करण्‍यात आली आहे, ज्यामुळे ओसाड जमिनीला नवजीवन मिळाले आहे. (Tata Motors)

(हेही वाचा – International yoga day: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्त तपासणी शिबिर)

इंटीग्रेटेड व्हिलेज डेव्‍हलपमेंट प्रोग्राम (IVDP) चा भाग म्‍हणून टाटा मोटर्सचा उपक्रम स्‍थलांतराला प्रतिबंध करण्‍यासोबत शाश्‍वत उत्‍पन्‍न प्रदान करत स्‍थानिक समुदायांसाठी उत्‍पन्‍न देखील निर्माण करतो. हा उपक्रम रोपांची काळजी घेण्‍यासाठी आणि त्‍यानंतर उत्‍पादनाची विक्री करण्‍यासाठी एमएनआरईजी (मनरेगा) योजनेचा उपयोग करतो. आतापर्यंत, १.५ दशलक्ष वृक्षारोपणामुळे वापरात नसलेल्‍या १३,००० एकर शेतजमिनीला उत्‍पादनक्षम वाडीमध्‍ये रूपांतरित करत प्रदेशातील १३,००० शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. या उपक्रमाने त्‍यांना पौष्टिक फळे देखील प्रदान केली आहेत, ज्‍यामुळे प्रदेशातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांचे आरोग्‍य व पोषण पातळ्यांमध्‍ये सुधारणा झाली आहे. (Tata Motors)

या सहयोगी मॉडेलमध्‍ये टाटा मोटर्स (Tata Motors) रोपांच्‍या खर्चामध्‍ये मदत करते, बीएफआयएफ इन्स्टिट्यूट फॉर सस्‍टेनेबल लाइव्‍हलीहूड्स अँड डेव्‍हलपमेंट (बीआयएसएलडी) कडून टेक्निकल सपोर्ट व प्रशिक्षण दिले जाते. तसेच रोपट्यांच्‍या देखभालीसाठी मजूरी म्‍हणून एमएनआरईजी (मनरेगा) च्‍या माध्‍यमातून सरकारकडून प्रकल्‍पाच्‍या बहुतांश खर्चासाठी अर्थसाह्य केले जाते. मजूरी प्रत्‍यक्ष शेतकऱ्यांच्‍या खात्‍यामध्‍ये हस्‍तांतरित केली जाते, जी रोपांच्‍या जगण्‍याच्‍या दरावर अवलंबून असते. (Tata Motors)

(हेही वाचा – Maharashtra Vidhan Parishad 2024: निवडणूक आयोगाकडून घोषणा; विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान)

टाटा मोटर्स येथील सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, ”एक दशलक्ष वृक्षारोपण उपक्रमाकडे दुहेरी धोरण म्‍हणून पाहता येऊ शकते. आपली अर्थव्‍यवस्‍था व इकोसिस्‍टम्‍स प्रबळ करणे आणि जमिन व जीवनाचे पोषण करणे. या उपक्रमामधून शाश्‍वत उदरनिर्वाह निर्माण करत भारतीय आदिवासी समुदायांना पाठिंबा देण्‍याप्रती आमची दृ‍ढ कटिबद्धता दिसून येते. पावसाळा सुरू झाला असताना आम्‍ही पालघर जिल्‍ह्याच्‍या नैसर्गिक अधिवासामध्‍ये आणखी एक दशलक्ष झाडे लावणार आहोत. बीआयएसएलडी आणि राज्‍य सरकारसोबतच्‍या आमच्‍या सहयोगामधून राष्‍ट्रनिर्मितीप्रती आमचा संयुक्‍त दृष्टिकोन व कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने, आम्‍ही झाडे लावण्यासोबत हरित व अधिक समृद्ध भविष्‍यासाठी आशा जागृत करत आहोत.” (Tata Motors)

वर्ष २०१८-१९ मध्‍ये सुरूवातीला टाटा मोटर्सने उदरनिर्वाह-आधारित वाडी मॉडेलचा पायलट उपक्रम लाँच केला होता, ज्‍यामध्‍ये नापीक किंवा कमी वापरलेल्‍या जमिनीवर योग्‍य पीकांसह फळ व वनीकरण झाडांची लागवड करणाऱ्या वृक्ष-आधारित कृषीचा समावेश होता. या पायलट उपक्रमांतर्गत पालघर जिल्‍ह्यातील प्रतिएकर जमिनीवर १०० फळझाडे (प्रामुख्‍याने आंबा व काजू) आणि १०० वनीकरण झाडे लावण्‍यात आली. वाडी मॉडेलला मिळालेल्‍या यशासह एक दशलक्ष वृक्षारोपण मोहिमेच्‍या माध्‍यमातून त्‍या मॉडेलची पुनरावृत्ती करण्‍यात आली. दोन्‍ही उपक्रमांनी समुदायांसाठी उत्‍पन्‍न स्रोत निर्माण करणे, प्रकल्‍प क्षेत्रांमधील जैवविविधता संपन्‍न करणे हा दुहेरी उद्देश पूर्ण केला आहे. (Tata Motors)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.