- ऋजुता लुकतुके
टाटा स्टील कंपनीच्या ग्रेट ब्रिटनमधील दोन प्रकल्पांतून २,८०० लोकांना डच्चू दिला जाणार आहे. कारण, कंपनीने दोन पोलाद भट्ट्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी ८ जुलैपासून बेमुदत संप पुकारला आहे. ब्रिटिश कर्मचारी संघटनेनं देशाच्या इतिहासात मागच्या ४० वर्षांत पहिल्यांदा पोलाद उद्योगात असा संप होत असल्याचं म्हटलं आहे. वेल्स प्रांतात टाटा स्टीलचे दोन प्रकल्प आहेत – पोर्ट टॅलबॉट आणि लॅनवर्न आणि या दोन्ही ठिकाणी संप होणार आहे. (Tata Steel Strike)
टाटा स्टीलच्या युकेमधील उलाढालीत गेल्या काही वर्षांत तोटा होत आहे. तो कमी करून प्रकल्पाचा खर्च कमी करावा यासाठी टाटा स्टीलने नवीन रणनीती आखली आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्यांनी नोकर कपातीची घोषणा केली. कार्बन इलेक्ट्रिक प्रकारच्या दोन नवीन भट्ट्या कंपनीतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. युके सरकारने त्यासाठी कंपनीला ५०० दशलक्ष पाऊंड्सचं अनुदान दिलं आहे. (Tata Steel Strike)
(हेही वाचा – Arabian Sea ‘या’ किल्ल्याबाबत राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर…)
‘टाटा स्टीलचे युकेमधील कर्मचारी फक्त त्यांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी हा संप करत नाहीएत. तर वेल्स प्रांतातील पोलाद उद्योगाच्या भवितव्याबाबतही ते साशंक आहेत. त्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे,’ असं कर्मचारी संघटनेच्या महासचिव शेरॉन ग्रॅहम यांनी म्हटलं आहे. टाटा स्टीलचे युकेमध्ये ८,००० च्या वर कर्मचारी आहेत. यातील २,८०० कर्मचारी येत्या १८ महिन्यांत कामावरून कमी करण्यात येणार आहेत. टाटा स्टील कंपनी नोकर कपातीवर ठाम आहे. (Tata Steel Strike)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community