रत्नागिरी जिल्ह्याचे प्रचंड नुकसान! साडेतीन लाख वीज कनेक्शन बंद!

तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

तौक्ते चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्याचे पूर्ण नुकसान झाले असून, या वादळामुळे मोठ्या प्रमाणात रत्नागिरी जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड 52 मिमी, दापोली 82 मिमी, खेड 49 मिमी, गुहागर 120 मिमी, चिपळूण 100 मिमी, संगमेश्वर 142 मिमी, रत्नागिरी 274 मिमी, राजापूर 208 मिमी, लांजा तालुक्यामध्ये 162 पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील साडेतीन लाख वीज कनेक्शन बंद पडली. 

जिल्ह्यात घरांचे नुकसान!

मंडणगड तालुक्यात 200 घरांचे, दापोली तालुक्यात 350 घरे, खेड तालुक्यात 30 घरांचे, गुहागर 05 घरे, चिपळूण 65 घरे, संगमेश्वर 102 घरे, रत्नागिरी 200 घरे, राजापूर 32 असे एकूण जिल्ह्यांत 1,028 घरांचे तर रत्नागिरीमध्ये 1, लांजामध्ये 1 आणि राजापूरमध्ये 05 असे एकूण 07 गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर येथे 1,  संगमेश्वर येथे 1, रत्नागिरीमध्ये 03 आणि राजापूरमध्ये 03 असे एकूण 08 व्यक्ती जखमी झाल्या असून गुहागरमध्ये 1 बैल, संगमेश्वरमध्ये 01 बैल आणि रत्नागिरीमध्ये 2 शेळ्या असे 4 पशुधन मृत झाले आहेत. जिल्ह्यामध्ये 450 झाडांची पडझड झाली असून 14 दुकाने व टपऱ्यांचे 09 शाळांचे तर 21 शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे.

(हेही वाचा : कोकण किनारपट्टीला वादळाचा जबर फटका! )

4,563 व्यक्तींचे स्थलांतर

वादळामुळे राजापूर तालुक्यात 652 व्यक्ती, रत्नागिरी तालुका 363, दापोली तालुका 2,373, मंडणगड तालुका 508, गुहागर तालुका 667 असे एकूण 4,563 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार कोणत्याही मच्छिमार बोटी समुद्रात गेलेल्या नाहीत, सर्व बोटी किनाऱ्यावर आहेत. हा अंदाज हा प्राथमिक स्वरुपाचा असून 17 मे 2021 रोजीपासून संबंधित तहसिलदारांमार्फत प्रत्यक्ष पंचानाम्याला सुरुवात करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्याचे झालेले नुकसान!

  • एकूण गावे 1,239 पैकी 760 गावांमधील विद्युत पुरवठा बंद
  • 55 उपकेंद्रांपैकी 28 बंद
  • 7,548 ट्रान्सफॉर्मर पैकी 5,665 बंद
  • 5,45,120 एकूण वीज कनेक्शन पैकी 3,57,409 बंद
  • 164 HT पोल बाधित
  • 391 LT पोल बाधित

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here