माटुंग्यातील ‘त्या’ घरांना शिवसेनेकडून मदतीचा हात!

‘तौत्के’ या चक्रीवादळात ज्या घरांचे छप्पर असलेल्या सिमेंट पत्रे तुटून गेले होते, त्या कुटुंबाना स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणाकर यांनी सिमेंटचे पत्रे उपलब्ध करून दिले आहेत.

माटुंगा रेल्वे वर्कशॉपची संरक्षक भिंत नाल्यालगत कोसळून झालेल्या घरांना शिवसेनेच्यावतीने मदतीचा हात पुढे केला. संरक्षक भिंत आणि त्यावरील झाडांमुळे आसपासच्या ९ ते १० घरांच्या छपरांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील रहिवाशांना सिमेंटचे पत्रे देत त्यांच्या डोक्यावरील छप्पर उपलब्ध करून दिले आहे.

चक्रीवादळाने वर्कशॉपची संरक्षक भिंत खचून नाल्यात पडली!

माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानकासमोरील पश्चिम रेल्वे अधिकारी वसाहत आणि कमला रामन नगर येथून दादर-धारावी नाला जात असून या नाल्याच्या एका बाजुला सेंट्रल माटुंगा रेल्वे वर्कशॉपची संरक्षक भिंत आहे, तर दुसऱ्या बाजुला कमला रामन नगर वसाहतीतील काही घरे वसलेली आहेत. परंतु मागील १६ व १७ मे २०२१ रोजी झालेल्या ‘तौत्के’ या चक्रीवादळाने या वर्कशॉपची संरक्षक भिंत खचून नाल्यात पडली. परंतू या भिंतीवर मोठ्या आकाराची वड, पिंपळ, जांभूळ तसेच अन्य जातीची झाडे असल्याने ही झाडे नाल्यालगत वसलेल्या झोपड्यांवर तसेच सार्वजनिक शौचालयांवर जावून पडली. त्यामुळे सार्वजनिक शौचालयांसह आसपासच्या ९ ते १० घरांचे नुकसान झाले आहे. या घरांचे मोठे नुकसान झाले असून त्यामध्ये घरांचे सिमेंट पत्रे तसेच घरांच्या भिंतीं कोसळल्या गेल्या आहेत, तर काहींच्या भिंतींना तडे गेले आहेत.

(हेही वाचा : दहावीची परीक्षा नाहीच! निकालासाठी ‘५०:३०:२०’ फॉर्म्युला! )

आमदार सदा सरवणकर यांनी सिमेंटचे पत्रे दिले!

याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या झोपड्यांचा सर्वे झाला असून शिवसेना खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर आणि स्थानिक नगरसेविका हर्षला अशिष मोरे यांनी याची पाहणी केली. परंतु पावसाळा तोंडावर असल्याने लोकांच्या घरावर छप्पर चढवणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या घरांचे छप्पर असलेल्या सिमेंट पत्रे तुटून गेले होते, त्या कुटुंबाना स्थानिक आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणाकर यांनी सिमेंटचे पत्रे उपलब्ध करून दिले आहेत. प्रत्येक घरांचे किती पत्र्यांचे नुकसान झाले याची माहिती घेवून त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबांना पत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. पावसाळ्यातही या कुटुंबांना सुरक्षित राहता यावे म्हणून सदा सरवकर यांनीही सिमेंटचे पत्रे उपलब्ध करून दिले आहे. याप्रसंगी शिवसेना नगरसेविका हर्षला आशिष मोरे तसेच शिवसेनेचे विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here