ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ता कर भरता यावा, यासाठी पालिकेने सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
( हेही वाचा : “मी नाराज नाही…मुख्यमंत्र्यांवर माझा पूर्ण विश्वास” मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण )
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जे करदाते त्यांचा मालमत्ता कर प्रत्यक्ष प्रभागसमिती कार्यालयात येऊन भरतात, अशा करदात्यांना त्यांचा देय मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिकेची सर्व प्रभाग व उप प्रभाग स्तरावरील कर संकलन केंद्रे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार आहेत.
कराची देयके महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
मंगळवार दिनांक 16 ऑगस्ट 2022 आणि शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत कर संकलनाकरिता कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्याकरता, मालमत्ता कराची देयके महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
ठाणेकर नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी करसंकलन केंद्रे सुरू राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community