Taxi करता इकोसोबत सीएनजीच्या इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांनाही परवानगी देण्याची मागणी 

20 वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या टॅक्सीवर परिवहन कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येत आहे.

230

सध्या महाराष्ट्रात प्रदूषण कायद्याच्या माध्यमातून २० वर्षे वयोमान पूर्ण झालेल्या काळ्या-पिवळ्या जुन्या टॅक्सी (Taxi) परिवहन विभाग पकडून घेते आणि त्यावर कारवाई करत आहे. त्यामुळे आता टॅक्सी चालकांना नवीन गाडी घ्यावी लागत आहे. मात्र परिवहन विभाग केवळ इको गाडीलाच परवानगी देत आहे. २०१३ पासून केवळ याच गाडीला परवानगी मिळत आहे. वस्तुतः ही गाडी प्रवासी वाहतुकीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांना परवानगी द्यावी, अशी मागणी भूमिपुत्र टॅक्सी (Taxi) संघटनेने परिवहन विभागाला केली आहे.

कल्याण मुरबाड मार्गावर चालणाऱ्या भूमिपुत्र टॅक्सी (Taxi) संघटनेचे कैलास घोलप म्हणाले, इको गाडी हे धोकादायक आहे. या गाडीला अपघात झाला तर त्यातील प्रवाशांचा मृत्यू होण्याची संभावना अधिक असते. या गाडीची चाकेही छोटी आहे आणि गाडी उंचीला अधिक आहे. त्यामुळे ही गाडी वळणाला कलंडते. गाडीचे दरवाजे सरकवण्याचे आहेत. त्यामुळे अपघात झाल्यावर दरवाजे कापून काढावे लागतात. अशा प्रकारे ही गाडी सर्वच बाबतीत असुरक्षित आहे. त्यामुळे परिवहन विभागाने या गाडीसोबत सीएनजीमधील इर्टिगा आणि बुलेरो या गाडयांना परवानगी द्यावी, अशी मागणी परिवहन विभागाला केली आहे.

(हेही वाचा MSRTC Bus Financial Report : भाडेवाढीनंतरही एसटीची आर्थिक स्थिती जेमतेमच; २००-३५०० कोटी रुपयांची देणी थकित)

कल्याण-मुरबाड तालुक्यात चालणाऱ्या मोटर्स टॅक्सीचे (Taxi) 20 वर्षे आयुर्मान पूर्ण झालेल्या टॅक्सीवर परिवहन कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे भूमिपुत्र टॅक्सी संघटनेचे परिवहन विभागाला निवेदन दिले, त्यात  मारुती कंपनीची सी.एन.जी. इंधनावर चालणारी इर्टिगा (6+1) कार परवान्यावर नोंद करून देण्याची विनंती केली. सध्या टॅक्सी चालक ट्रॅक्स या कंपनीचे गामा गाडी वापरत होते, ती गाडी डिझेलवर चालणारी होती. ही गाडी कंपनीने बंद केली आहे. त्याचप्रमाणे डिझेलवर इंधनावर चालणारे अन्य वाहन म्हणून महेंद्रा कंपनीची बोलेरो उपलब्ध आहे. मुंबईतील विशिष्ठ वयोमर्यादंनंतरची परिवहन वाहने सी.एन.जी./ एल.पी.जी. इंधनावरील रुपांतरीत झाली नाहीत तर जी वापरातून बाद करण्याबाबत यावीत म्हणून उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. याकरीता प्राधिकरणाने वेगवेगळ्या संवर्गातील इंधनावर चालणाऱ्या वाहनांची वयोमर्यादा ठरवून दिली आहे. त्यामुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.