संप लांबणीवर; रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीबाबत दहा दिवसांमध्ये निर्णय

83

मुंबईच्या टॅक्सीमेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून संपाचा इशारा दिला होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची विविध मागण्यांसंदर्भात बैठक झाली. या बैठकीत भाडेवाढीबाबत दहा दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल असे आश्वास सामंत यांनी दिले या आश्वासनानंतर टॅक्सीमेन्स युनियनने तूर्तास आपला संप पुढे ढकलला आहे.

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा; अन्यथा होऊ शकते आर्थिक फसवणूक)

टॅक्सी चालकांना आर्थिक फटका

CNGच्या दरवाढीमुळे काळ्या- पिवळ्या टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो 6 रुपये कपात केली. ही कपात कमीच असून, टॅक्सी चालकांना आर्थिक फटका बसत आहे. 1 मार्च 2021 झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत CNGच्या दरात एकूण 32 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे टॅक्सी- रिक्षा चालकांना प्रत्येक दिवशी 250 ते 300 रुपये अधिक मोजावे लागतात, असे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल.क्वाड्रोस यांनी सांगितले.

संप तूर्तास पुढे ढकलला 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत रिक्षा, टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी तसेच युनियनकडून ए.एल.क्वाड्रोस आणि मुंबई ऑटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव उपस्थित होते. भाडेवाढीवर झालेल्या चर्चेत दहा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतली असे उदय सामंत यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. या आश्वासनानंतर मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने संप पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.