TB hospital : शिवडीतील क्षयरोग रुग्णालय बनणार फायर प्रुफ

आशियातील सर्वात मोठे असे विशेष क्षयरोग रुग्णालयात दररोज सुमारे १००-१५० बाह्यरुग्ण कक्षात उपचार घेत असतात.

190
TB hospital : शिवडीतील क्षयरोग रुग्णालय बनणार फायर प्रुफ
TB hospital : शिवडीतील क्षयरोग रुग्णालय बनणार फायर प्रुफ

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील विद्यमान अग्निशमन यंत्रणा जुनी झाली असून बहुतांशी विभागांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने आता या रुग्णालयातील यंत्रणा नव्याने बसवून हे रुग्णालय फायर प्रुफ बनवण्यात येणार आहे. क्षयरोग रुग्णालय हे १२०० खाटांचे विशेष रूणालय आहे. आशियातील सर्वात मोठे असे विशेष क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयात दररोज सुमारे १००-१५० बाह्यरुग्ण कक्षात उपचार घेत असतात.

तसेच रूग्णालयात दररोज ५०-६० रुग्ण दाखल होत असतात. मुंबईत औषध प्रतिरोधक क्षयरोग (औ.प्र.क्ष.) रुग्णांची संख्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त असून मुंबईत दरवर्षी एमडीआर क्षयरोगबाधित सुमारे ४००० रूग्णांची नोंद होत असते. त्यामुळे या क्षय बाधित रुग्णांवर या शिवडीतील विशेष रुग्णालयात उपचार केले जात असून येथील रुग्णांच्या तसेच रुग्णालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आग प्रतिबंधक यंत्रणा सक्षम आणि कार्यान्वित असणे आवश्यक आहे.

(हेही वाचा – Chhagan Bhujbal : … तर शरद पवारांनी आम्हाला समर्थन द्यावे; छगन भुजबळांनी वेळ साधली)

मागील काही वर्षात रुग्णालयात लागलेल्या आगीच्या दुर्घटना पाहता या क्षयरोग रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणांची तपासणी अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आली. या पाहणीत सध्या क्षयरोग रुग्णालयात बसविण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा जूनी आणि अपूरी आहे. त्यामुळे कोणतेही अनुचित अपघात किंवा दुर्घटना टाळण्यासाठी क्षयरोग रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे.

या संदर्भात अतिरिक्त विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या स्थळ निरीक्षण आणि शिफारशीच्या अनुषंगाने या रुग्णालयातील अग्निशामक यंत्रणा अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यासाठी मेसर्स अजंटा इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स एलएलपी ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी विविध करांपोटी ५ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपये खर्च केला जाणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.