गेल्या काही वर्षांपासून राज्यात शिक्षक (Teacher Recruitment) भरती झाली नाही. उमेदवार गेल्या कित्येक दिवसांपासून शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत आहेत. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. त्यामुळे आता अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नुकताच शिक्षण विभागाकडून शिक्षक भरती प्रक्रियेबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा आणि खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक भरती केली जाणार आहे.
(हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांचा खुलासा, म्हणाले…)
या लिंकवर थेट अर्ज करा
शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीच्या जाहिराती https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Govind Dev Giri Maharaj : ज्ञानवापी आणि मथुरेतील श्रीकृष्ण मंदिराबाबत गोविंददेव गिरी महाराज यांचे मुसलमानांना आवाहन, म्हणाले…)
मुलाखत न देताही नोकरी मिळणार –
पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 या संकेतस्थळावरील मुख्य बारवर होम, डाउनलोड आणि एफएक्यू देण्यात आले आहे. त्यातील डाऊनलोडवर क्लिक केल्यानंतर उमेदवारांना मुलाखती शिवाय भरल्या जाणाऱ्या जागा व मुलाखती घेऊन भरल्या जाणाऱ्या जागा दिसून येतील. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात किती व कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरती संदर्भातील पुढील प्रक्रियेची सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मॅन्युअलही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community