Teacher Exam : शिक्षक प्रेरणा परीक्षेवर शिक्षकांचाच बहिष्कार, अनेक परीक्षा केंद्रांवर शुकशुकाट

162
Teacher Exam : शिक्षक प्रेरणा परीक्षेवर शिक्षकांचाच बहिष्कार, अनेक परीक्षा केंद्रांवर शुकशुकाट
Teacher Exam : शिक्षक प्रेरणा परीक्षेवर शिक्षकांचाच बहिष्कार, अनेक परीक्षा केंद्रांवर शुकशुकाट

धाराशिव जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंत विद्यार्थांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परीक्षेवर शिक्षकांनीच पाठ फिरवल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर केवळ एक ते दोन शिक्षक वगळता शुकशुकाट पहायला मिळाला.

शिक्षकांचे विषय ज्ञान वृद्धिंगत व्हावे, स्पर्धात्मक वातावरणात गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी संधी मिळावी, विद्यार्थ्यांना अद्यावत ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांकरिता या प्रेरणा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

(हेही वाचा – Jaipur Express Firing : जयपूर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे पोलिसांकडूनच गोळीबार; ४ जणांचा मृत्यू)

दरम्यान विभागीय आयुक्तांनी शिक्षक प्रेरणा परीक्षा घेण्यापूर्वी सर्व संघटना व अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि परीक्षेविषयी माहितीही देण्यात आली होती. शिक्षक प्रेरणा परीक्षा ऐच्छिक होणार असल्यामुळे कारवाई होणार नसल्याचे सांगितले होते. तेव्हा या निर्णयाला सर्व संघटनांनी संमती दर्शवली होती. मात्र, या परीक्षेला जिल्ह्यातील शिक्षकांनी आणि अनेक संघटनांनी पाठ फिरवल्यामुळे अनेक परीक्षा केंद्रे ओस पडली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.