Teacher’s Day 2024 : का साजरा केला जातो शिक्षक दिन? आणि काय आहे महत्त्व ?

167
Teacher's Day 2024 : का साजरा केला जातो शिक्षक दिन? आणि काय आहे महत्त्व ?
Teacher's Day 2024 : का साजरा केला जातो शिक्षक दिन? आणि काय आहे महत्त्व ?

भारतात दरवर्षी ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती, विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न प्राप्तकर्ता डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. (Teacher’s Day 2024) ते एक महान शिक्षक, तत्त्वज्ञ आणि विद्वान होते. त्यांना १९५४ मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आणि १९६३ मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व देण्यात आले होते. त्यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. (Teacher’s Day 2024)

देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस आपल्या शिक्षकांबद्दल सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. शिक्षक आपल्याला केवळ शिक्षणच देत नाहीत तर जीवनाच्या खडतर मार्गावर चालण्यास शिकवतात.

(हेही वाचा – BMC School : शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत महापालिका शिक्षण विभागाची उदासिनता, मार्च महिन्यात प्रक्रिया राबवूनही सप्टेंबर पर्यंत नियुक्ती नाही!)

भारतीय संस्कृतीत गुरूला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। हा दिवस भारतीय संस्कृतीनुसार अत्यंत महत्वाचा आहे. या विशेष दिवशी, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विविध उत्सवांमध्ये सहभागी होतात, जे त्यांच्या नियमित कार्यक्रमांपेक्षा वेगळे असतात. या दिवशी विद्यार्थ्यांकडून भाषणे, कविता वाचन, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबवले जातात.

या उपक्रमांद्वारे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करतात आणि त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी संपूर्ण भारतात, विद्यार्थी आपल्या शिक्षकांना नमस्कार करतात, भेटवस्तू देतात, अभिनंदनाचे संदेश पाठवून शिक्षकांचा सन्मान करतात.

५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा असा प्रस्ताव त्यांच्या काही विद्यार्थी आणि परिचितांनी दिला होता. १९६२ मध्ये जेव्हा डॉ. राधाकृष्णन (Dr. Sarvepalli Radhakrishnan) भारताचे राष्ट्रपती होते, तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी आणि मित्र त्यांचा वाढदिवस साजरा करू इच्छित होते. मात्र, डॉ. राधाकृष्णन यांनी एका भव्य उत्सवाला संमती दिली नाही. आपला वाढदिवस साजरा करण्याऐवजी ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास आपल्याला अभिमान वाटेल, असे ते म्हणाले. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि तेव्हापासून भारतात ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. (Teacher’s Day 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.