गूगलची मूळ कंपनी अल्फाबेटने ग्लोबल रिक्रूटमेंट टीममधील जवळपास १०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. (Tech Layoffs) कंपनीने घेतलेला निर्णय हा जागतिक स्तरावरील टाळेबंदीचा भाग नाही. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना कंपनीमध्ये अन्य ठिकाणी भूमिका शोधण्यासाठी मदत होणार आहे. अल्फाबेट कंपनी ही कमर्चाऱ्यांची कपात करणारी या तिमाहीमधील पहिलीच मोठी कंपनी ठरली आहे. मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझाॅनसारख्या कंपन्यांनी २०२३ च्या सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अनेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत.
(हेही वाचा – Hindi Language Day : हिंदी सर्व स्थानिक भाषांना सक्षम करण्याचे माध्यम बनेल – अमित शहा)
अमेझाॅन, मायक्रोसॉफ्ट, ॲपल मेटा, ट्वीटर अशा अनेक दिग्गज कंपन्यांनी कपात केली आहे. काही कंपन्यांनी २ वेळा कपात केली आहे. आता पुन्हा एकदा गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटने आपल्या जागतिक रिक्रूटमेंट टीममधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे; कारण टेक कंपनीने कमर्चारी नियुक्त करणे देखील कमी केले आहे. कॅलिफोर्नियामध्ये स्थित असणाऱ्या अल्फाबेट कंपनीने जानेवारीमध्ये सुमारे १२ हजार नोकऱ्यांची कपात केली आहे. म्हणजेच त्यांनी एकूण ६ टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. (Tech Layoffs)
चॅलेंजर, ग्रे या एम्प्लॉयमेंट फार्मच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ऑगस्टमधील कपात ही जुलैच्या तुलनेत तिप्पट आहे, तर एक वर्षाच्या तुलनेत चार पटीने वाढली आहे. रॉयटर्सद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अर्थशास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला होता की, सप्टेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये राज्य बेरोजगारीच्या लाभाच्या नव्या दाव्यांमध्ये ८ टक्के वाढ होईल. (Tech Layoffs)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community