Luna – 25 : रशियाच्या लुना -25 या अवकाशयानात तांत्रिक बिघाड, आपत्कालिन परिस्थितीमुळे पुढील कक्षेत जाण्यास हुकले

21 ऑगस्टला लुना चंद्रावर उतरणार

209
Luna - 25 : रशियाच्या लुना -25 या अवकाशयानात तांत्रिक बिघाड, आपत्कालिन परिस्थितीमुळे पुढील कक्षेत जाण्यास हुकले
Luna - 25 : रशियाच्या लुना -25 या अवकाशयानात तांत्रिक बिघाड, आपत्कालिन परिस्थितीमुळे पुढील कक्षेत जाण्यास हुकले

रशियाच्या लुना -25 या अवकाशयानात तांत्रिक बिघाड झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याबाबत रशियन स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसने दिलेल्या माहितीनुसार, कक्षा बदलाना आपत्कालिन परिस्थिती उद्भवली. त्यामुळे कक्षा बदल योग्य प्रकारे होऊ शकला नाही.

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेली माहिती अशी की, रशियन एजन्सीने तांत्रिक बिघाडाबद्दल जास्त माहिती शेअर केलेली नाही. लुना -25 ला प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये पाठवताना आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाली. 21 ऑगस्टला लुना चंद्रावर उतरणार आहे.

(हेही वाचाPlastic Ban : मुंबईत उद्यापासून प्लास्टिक पिशवी बंद, महापालिकेकडून कडक कारवाई सुरू)

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मिशन उतरण्याची ‘ही’ पहिलीच वेळ

21 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील बोगुस्लाव्स्की विवराजवळ उतरेल.रशियाने 47 वर्षांनंतर चंद्रावर आपली मोहीम पाठवली आहे. याआधी 1976 मध्ये त्यांनी लुना-24 मिशन पाठवले होते. सुमारे 170 ग्रॅम चंद्रावरील मातीसह लुना-24 सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले होते. आतापर्यंत झालेल्या सर्व चंद्र मोहिमा चंद्राच्या विषुववृत्तावर पोहोचल्या असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मिशन उतरण्याची ही पहिलीच वेळ असेल.

लुनाच्या आणखी तीन मोहिमा…
रशियाची लुना-25 मोहीम चंद्रावर पूर्णपणे स्वयंचलित तळ तयार करण्याच्या त्याच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. रोसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी सांगितले की, 2027, 2028 आणि 2030 मध्ये लुनाच्या आणखी तीन मोहिमा सुरू केल्या जातील. यानंतर आम्ही चीनसोबत पुढच्या टप्प्यात प्रवेश करू. या टप्प्यात आम्ही चंद्रावर मानवयुक्त मोहीम पाठवू आणि चंद्राचा तळही तयार करू.
चांद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी वेळ का लागतो ?

ISRO ने 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान-3 मोहीम प्रक्षेपित केली. या मोहिमेसाठी कमी इंधन वापरले जाते आणि कमी खर्चात वाहन चंद्रावर पोहोचते, त्यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेत इंधनाची बचत होते, मात्र त्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे चांद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत आहे.लुना-25 चंद्राच्या बोगुस्लाव्स्की विवराजवळ उतरेल. त्याचे कोऑर्डिनेट्स 72.9˚S आणि 43.2˚E आहेत. चांद्रयान मँझिनस यू क्रेटरजवळ उतरेल. त्याचे कोऑर्डिनेट्स 69.36˚S आणि 32.34˚E आहेत. या दोन विवरांमधील अंतर 100 किमीपेक्षा जास्त आहे.

लुना – 25 अवकाशयान कार्य…
– चंद्रावरील मातीचे नमुने आणि बर्फाचे प्रमाण शोधणे
– नवीन सॉफ्ट-लँडिंग आणि इतर अंतराळ तंत्रज्ञानाची चाचणी करणे
– दक्षिण ध्रुवावरील मातीच्या भौतिक-यांत्रिक गुणधर्माचा अभ्यास करणे
– सौर वाऱ्याचा प्रभाव पाहण्यासाठी प्लाझ्मा-धूळीचा अभ्यास करणे
– चंद्रावरील खोल जागा आणि दूरच्या ग्रहांच्या शोधासाठी लॉन्चिंग पॅड तयार करणे

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.