महाराष्ट्र राज्यात तांत्रिक व वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी केली आहे. या अभियानाचा उद्देश जागतिक दर्जाची तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादने आणि सेवा विकसित करून महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील तांत्रिक वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र बनवणे आहे.
अभियानाचे प्रमुख उद्दिष्टे
मंत्री सावकारे (Sanjay Savkare) यांनी सांगितले की, या अभियानाच्या माध्यमातून तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील गोष्टींवर भर दिला जाईल:
(हेही वाचा – मुंबईत आणखी ३०० नव्या Local सेवा सुरू होणार; केंद्रीय रेल्वे मंत्री Ashwini Vaishnaw यांची माहिती)
अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे:
- विशेष चाचणी प्रयोगशाळा, संशोधन केंद्रे आणि कौशल्य विकास संस्थांची स्थापना.
- तांत्रिक वस्त्रोद्योग निर्मिती व विकासाला सहाय्य करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब.
कुशल मनुष्यबळ तयार करणे:
- प्रगत यंत्रसामग्री व तंत्रज्ञान हाताळण्यासाठी तांत्रिक कुशल मनुष्यबळ विकसित करणे.
संशोधन व विकासाला प्रोत्साहन:
- तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधनासाठी प्रोत्साहन आणि पाठिंबा.
- तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे.
बाजारपेठेतील प्रवेश सुलभ करणे:
- तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश मिळवून देण्यासाठी सहाय्य.
जागरूकता वाढवणे:
- तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादनांच्या संभाव्य उपयोगक्षमता व फायद्यांबाबत जागरूकता निर्माण करणे.
उद्योग व शिक्षण क्षेत्रातील सहकार्य:
- शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रांमध्ये सहकार्य सुलभ करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करणे.
गुणवत्ता मानके प्रस्थापित करणे:
- तांत्रिक वस्त्रोद्योग उत्पादनांसाठी गुणवत्ता मानके आणि प्रमाणपत्रांची अंमलबजावणी.
पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब:
- शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक उत्पादन प्रक्रिया व सामग्रीचा वापर वाढवणे.
(हेही वाचा – Baba Siddique हत्या प्रकरणात झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिली महत्वाची माहिती)
महाराष्ट्राची दिशा राष्ट्रीय व जागतिक पातळीवर
मंत्री सावकारे (Sanjay Savkare) यांनी सांगितले की, या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रात देशाचे प्रमुख केंद्र बनेल. जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र अधिक सक्षम होईल आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल.
तांत्रिक वस्त्रोद्योगातील नवकल्पना, उत्पादन प्रक्रिया आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून महाराष्ट्र देशाच्या आर्थिक प्रगतीत मोठा वाटा उचलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान’ राज्यातील औद्योगिक क्षेत्राला नवीन गती देईल आणि जागतिक स्तरावर ओळख निर्माण करेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community