गुगल मॅप घेऊन आलंय ‘हे’ भन्नाट फीचर; घरबसल्या समजणार रस्ते बंद की चालू

तुम्ही प्रवासादरम्यान, गुगल मॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गुगलने गुगल मॅपमध्ये स्ट्रीट व्ह्यू फीचर जोडले असून, रस्त्यांचे आणि सार्वजनिक इमारतींचे 360 अंशातील व्ह्यू पाहता येणार आहेत. यामुळे प्रवासात आता वेगळीच अनुभूती येणार आहे.

काय आहे सेवा?

या फीचरमुळे आता घरी बसून कोणत्याही ठिकाणाचा अनुभव घेता येईल. मॅपमुळे पोलिसांच्या मदतीने वेग मर्यादा, रस्ते बंद आहेत की चालू, सुरु असलेले काम पाहता येणार आहे. या वैशिष्ट्याची खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. कंपनीने 15 वर्षांपूर्वी याला अमेरिकेत सादर केले होते.

कोंडी फुटणार?

गुगलने रस्ता सुरक्षा उपायांसह वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणांसोबत सहकार्य करण्याची घोषणा केली आहे. सेफ ड्रायव्हिंगसाठी मॅप वाहतूक अधिका-यांनी शेअर केलेल्या वेग मर्यादा दाखवेल.

किती शहरांमध्ये सुविधा?

सध्या हे फिचर बंगळुरमध्ये सुरु करण्यात आले असून, हळूहळू 10 शहरांमध्ये उपलब्ध करण्यात येईल. यात सुरुवातीला दीड लाख किलोमीटरचे रस्ते समाविष्ट असतील. या वर्षाच्या अखेरीस 50 शहरांमध्ये ही सुविधा विस्तारित करण्याचे कंपनीचे उद्धिष्ट आहे.

( हेही वाचा: Patra Chawl Land Case: राऊतांविरूद्ध साक्ष देणाऱ्या स्वप्ना पाटकरांना जीवे मारण्याची धमकी )

हे नवीन फीचर नेमके आहे काय?

गुगल स्ट्रीट व्ह्यू हे असे तंत्रज्ञान आहे जे गुगल मॅप्स आणि अॅपच्या मदतीने रस्त्यांवरील विविध ठिकाणांची माहिती मिळते. हे तंत्रज्ञान 2007 मध्ये अमेरिकेत वापरले गेले. सध्या जगभरात अनेक ठिकाणी हे फीचर वापरले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here