काॅल रेकाॅर्ड करताय? तर हे जाणून घ्या…

अॅंड्राईड फोनमध्ये सहजपणे उपलब्ध असणारे फीचर म्हणजे काॅल रेकाॅर्डींग. कोणत्याही व्यक्तीचा काॅल रेकाॅर्ड करायचा असेल, तर आपण काॅल रेकाॅर्डींगचा फीचरचा वापर करतो. पण एखाद्या व्यक्तीच्या नकळत त्याचा काॅल रेकाॅर्ड करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे काॅल रिसिव्ह केल्यानंतर, जर काॅल रेकाॅर्ड केला जात असेल तर ज्या व्यक्तीला काॅल केला आहे. त्या व्यक्तीला काॅल रेकाॅर्ड केला जात असल्याचे समजते. समोरच्या व्यक्तीच्या संमतीशिवाय काॅल रेकाॅर्ड करता येऊ नयेत, म्हणून आता अॅंड्राईड फोनमध्ये लवकरच काॅल रेकाॅर्डींगची सुविधा बंद केली जाणार आहे.

रेकाॅर्डींगचे फीचर असल्यास

 • अॅंड्राॅइड फोनमध्ये आधीपासूनच काॅल रेकाॅर्डिंगचे फीचर असेल तर सर्व काॅल रेकाॅर्ड करता येऊ शकतात.
 • प्री लोडेड काॅल रेकाॅर्डिंग अॅप किंवा फीचरच्या अॅक्सेसिबिलिटीसाठी परवानगीची गरज राहणार नाही, असे गुगलने स्पष्ट केले आहे.
 • काॅल रेकाॅर्ड करायचा असल्यास व्यक्तीची अनुमती असणे गरजेचे असेलच.

गुगल प्ले स्टोअरची नवीन पाॅलिसी

 • रिमोट काॅल ऑडिओ रेकाॅर्डिंगसाठी अॅक्सेसिबिलिटी एपीआयचा आग्रह धरला जाऊ शकत नाही.
 • याचाच दुसरा अर्थ असा की, अॅप्सना काॅल रेकाॅर्डिंगची परवानगी नसेल.
 • ट्रू काॅलर, ऑटोमॅटिक काॅल रेकाॅर्डर, क्यूब एसीआर आणि दुसरे लोकप्रिय अॅप प्ले स्टोअरवर निष्क्रिय ठरु शकतील.

शाओमी मोबाइल असल्यास …

 • शाओमीचा मोबाइल ज्यांच्याकडे आहे त्यांना मात्र काही तणाव नाही.
 • गुगल पिक्सेल आणि शाओमी या स्मार्टफोन्समध्ये असलेल्या डायलर अॅपवर डिफाॅल्ट काॅल रेकाॅर्डर आहे.

( हेही वाचा: आता विद्यार्थी शिकणार नाहीत ‘इस्लामिक साम्राज्याचा उदय’, धडे वगळले जाणार )

या स्मार्टफोनमध्ये असते फीचर…

 • सॅमसंगल गॅलेक्सी ए 12
 • रिअल्मी सी 25
 • ओप्पो के 10
 • वनप्लस

युरोपात गुन्हा

 • कोणाच्याही समंतीविना फोन रेकाॅर्ड करणे युरोपात गुन्हा ठरवला जातो.
 • असे कृत्य करणा-यास युरोपीय कायद्यानुसार, कठोर शासनही केले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here