ठुमका लाव नाहीतर निलंबित करेन; लालूपूत्र Tej Pratap Yadav यांनी दिली होळीच्या दिवशी पोलिसाला धमकी

79
ठुमका लाव नाहीतर निलंबित करेन; लालूपूत्र Tej Pratap Yadav यांनी दिली होळीच्या दिवशी पोलिसाला धमकी
ठुमका लाव नाहीतर निलंबित करेन; लालूपूत्र Tej Pratap Yadav यांनी दिली होळीच्या दिवशी पोलिसाला धमकी

राष्ट्रीय जनता दलाचे (Rashtriya Janata Dal) नेते तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह धुलिवंदन सण साजरा केला. त्यावेळी तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी पोलीस कर्मचाऱ्याकडे केल्या फरमाईशमुळे अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे कपडे फाडून तेज प्रताप यांनी रंग त्यांच्यावर रंग उधळले. तसेच गाण्याच्या कार्यक्रमात चक्क पोलिसालाच ठुमके (नृत्य) लावण्यास भाग पाडले.

( हेही वाचा : Holi ला धर्मांधांनी केला हिंदूंवर हल्ला; अमित मालवीय म्हणाले, पश्चिम बंगालचा बांगलादेश…

पोलिसांच्या गणवेशात असलेल्या पोलीसाला पाहून तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) म्हणाले की, तुला आज ठुमके लावावे लागतील नाहीतर निलंबित व्हावे लागेल. हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून बिहारमध्ये (Bihar) यादव यांच्या सत्ताकाळात कशाप्रकारे जंगलराज सुरु होते, अशी टीका भाजपाकडून केली जात आहे. (Tej Pratap Yadav)

होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) म्हणाले की, “ये शिपाई, मी आता एक गाणे वाजवणार आहे. त्यावर तुला नाचावे (ठुमके) लागेल. नाही नाचलास तर तुला निलंबित करू” अशी एकप्रकारे धमकीच यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्याला दिली. त्यावेळी यादव यांचे हितचिंतक असणारी एक व्यक्ती त्यांना पोलीसासोबत असे कृत्य करू नये, असे सांगत होती. पण होळीच्या (Holi) नशेत आणि सत्तेच्या मस्ती मदमस्त झालेले यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्याला नाचायला भाग पाडले. तसेच तेज प्रताप यादव यांनी कुर्ता फाड होळी (Holi) खेळल्याचे व्हिडिओत दिसत आहे. कारण यादव यांच्या शेजारी बसलेला माणसाचे कपडे फाटलेले होते. तसेच यादव कपडे फाडत असल्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. (Tej Pratap Yadav)

जसा बाप तसा पुत्र, लालूंनी आपल्या इशाऱ्यावर व्यवस्थेला नाचविले आणि आता मुलगा..

याप्रकरणी भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला (Shehzad Poonawalla) म्हणाले की, जसा बाप तसा पुत्र. लालू यादव यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या इशाऱ्यावर व्यवस्थेला नाचविले आणि बिहारला (Bihar) जंगलराजमध्ये बदलले. त्याचप्रमाणे आता त्यांचा मुलगा सत्तेच्या बाहेर असतानाही कायद्याच्या रक्षकांना खुलेआम धमकी देत आहे, अशी टीका पुनावाला (Shehzad Poonawalla) यांनी यादव यांच्यावर केली. (Tej Pratap Yadav)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.