तेलंगणा (Telangana) येथील नागरकुरनूल (Nagarkurnool) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. नागरकुरनूल (Nagarkurnool) जिल्ह्यातील एका बांधकामावेळी बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत किमान सहा कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर लगेचच तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बचावकार्य सुरु करण्यात आले असल्याची माहिती काही वृत्तसंस्थांनी दिली आहे.
( हेही वाचा : Champions Trophy, Ind vs Pak : भारत-पाक सामन्यांदरम्यानचे ५ वादाचे प्रसंग)
दरम्यान ही ही दुर्घटना घडली तेव्हा बोगद्यात किती कामगार होते? याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. मात्र, एका पोलीस अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,किमान ६ ते ८ लोक अडकले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरी या घटनेबाबत तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक निवेदन जारी केले आहे.त्या निवेदनात म्हटलं आहे की, “या दुर्घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना व अग्निशमन विभाग आणि हैदराबाद (Hyderabad) आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण संस्थेतील (HYDRAA) कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत आणि उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.” या संदर्भातील वृत्त माध्यमात आहे. (Nagarkurnool)
राज्याचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी आणि पाटबंधारे सल्लागार आदित्य नाथ दास, आयजी सत्यनारायण आणि डीजी अग्निशमन सेवा जीव्ही नारायण राव हे देखील या घटनेकडे लक्ष देऊन आहेत. तसेच त्यांनी या दुर्घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community