Telecom Department: देशभरातील ‘ते’ 6 लाख मोबाईल नंबर्स बंद होणार!

187
Telecom Department: देशभरातील 'ते' 6 लाख मोबाईल नंबर्स बंद होणार!
Telecom Department: देशभरातील 'ते' 6 लाख मोबाईल नंबर्स बंद होणार!

देशातील 6 लाख 80 हजार मोबाईल नंबर (Mobile Numbers) आता टेलिकॉम विभाग (Telecom Department) बंद करण्याच्या तयारीत आहे. चुकीच्या कागदपत्रांचा (Wrong Document) वापर करुन हे मोबाईल नंबर्स खरेदी करण्यात आल्याचा संशय टेलिकॉम विभागाला आहे. त्यामुळे टेलिकॉम विभागानं कारवाईचा बडगा उचलला असून येत्या 60 दिवसांच्या आत तब्बल 6 लाखांहून अधिक मोबाईल नंबर टेलिकॉम विभागाकडून बंद केले जाणार आहेत. (Telecom Department)

युजरने जर चुकीच्या कागदपत्रांचा वापर केला तर…

दरम्यान, कोणत्याही युजरनं जर चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून ही कागदपत्रं मिळविली असतील, तर असे नंबर्स बंद होणं निश्चित असल्याचं टेलिकॉम विभागानं सांगितलं आहे. देशाच्या दूरसंचार विभागानं टेलीकॉम सर्विस (Telecom Department) प्रोवायडर्सना सहा लाखांहून अधिक मोबाईल कनेक्शनची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील 6 लाख 80 हजार मोबाईलची संख्या असून या नंबरला फेक किंवा बनावट डॉक्युमेंटचा आधार घेऊन चालू केल्याचा संशय टेलिकॉम विभागाला आहे. त्यामुळेच टेलिकॉम विभाग ही धडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. (Telecom Department)

नंबर्स येत्या 60 दिवसांत बंद

दूरसंचार विभागाने आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) द्वारे विश्लेषण केल्यानंतर देशभरातील अंदाजे 6.80 लाख मोबाईल कनेक्शन स्पॅम क्रमांक असल्याचं समोर आलं आहे. जे कनेक्शन्स खोट्या किंवा बनावट कागदपत्रांचा वापर करून मिळवल्या गेल्याचा संशय आहे, असे मोबाईल नंबर्स येत्या 60 दिवसांत बंद करण्याची मोहिम टेलिकॉम विभागानं हाती घेतली आहे. (Telecom Department)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.