राज्यात तापमान घसरले! वेण्णा लेक परिसरात पारा ६ अंशावर

राज्यात तापमानाचा पारा उतरू लागल्याने पुणे, सातारा, नाशिकसह राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. पुणे, नाशिकमध्ये नागरिकांना हुडहुडी भरायला सुरुवात झाली आहे. थंडीची चाहुल लागल्याने विविध ठिकाणी स्वेटर्स, कान टोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत, रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे.

( हेही वाचा : वर्ल्डकपमधील टीम इंडियाच्या पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय! संपूर्ण निवड समिती बरखास्त)

राज्यातील तापमान घसरले

अनेक दिवस रेंगाळलेल्या पावसानंतर दिवाळीच्या सुमारास थंडीची चाहूल लागली होती. थंडीमुळे आता महाबळेश्वर, नाशिक, निफाड येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सुद्धा वाढ झालेली आहे. नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढला आहे. पुण्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला असून ठिकठिकाणी पहाटे लोक शेकटोची ऊब घेताना दिसत आहेत.

दरम्यान राज्यातील बऱ्याच ठिकाणी रात्रीपासून कडाक्याची थंडी तर दुपारी उन्हाचा चटका बसत असल्याचे दिसून येत आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन दिवस राज्यात 2 ते 3 अंशांनी किमान तापमानात घट होऊ शकते.

राज्यात किमान तापमान – १९ नोव्हेंबर

 • सातारा – १३.२
 • जेऊर – १२
 • नांदेड – १४
 • सोलापूर १७.३
 • कोल्हापूर १६.४
 • जळगाव १३
 • औरंगाबाद ११.१
 • परभणी १३.२
 • उदगीर १२.८
 • पुणे ११.३
 • डहाणू १७.५
 • जालना १२.८
 • अहमदनगर १३.८
 • नाशिक १०.४
 • सांगली १५.२
 • बारामती १२.१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here