तापमान बदलामुळे (Temperature Effect) जगभरात ऋतुचक्रात अनेक बदल घडत आहेत. तापमान, आर्द्रता आणि पर्जन्यमान यातील मोठ्या चढउतारांमुळे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासांच्या जीवनचक्रावर मोठा परिणाम होत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर डासांच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण होऊन हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक हिवताप अहवालातून हे सत्य समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने वार्षिक हिवताप अहवाल जाहीर केला आहे. त्यात प्रामुख्याने तापमान बदलामुळे हिवतापाच्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार, मागील वर्षी जगभरात २ कोटी ४९ लाख जणांना हिवतापाचा संसर्ग झाला होता. त्याआधीच्या वर्षापेक्षा ही रुग्णसंख्या सुमारे ५० लाखांनी अधिक आहे. हिवतापाचा प्रतिबंध करण्यात औषधे आणि कीटकनाशकांचा प्रतिरोध, मानवी संकटे, अपुरी साधने, तापमान बदलाचे परिणाम ही मुख्य कारणे आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या पाकिस्तान, इथियोपिया, नायजेरिया, पापुआ न्यू गिनी आणि युगांडा या देशांमध्ये आहे.
(हेही वाचा – Deepak Chahar : दीपक चहर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकणार?)
रुग्णवाढीचे कारण…
राज्यात यंदा हिवतापाचे १४ हजार २२१ रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सर्वाधिक ६ हजार ४९८ रुग्ण आहेत. त्या खालोखाल गडचिरोलीत ५ हजार ३३ रुग्ण आहेत. तापमानात वाढ झाल्यास डासांचे आयुर्मान वाढते. पाऊस जास्त पडल्यास डासांची उत्पत्ती वाढते. पाऊस कमी पडल्यास पाणीटंचाई होऊ नये म्हणून अनेक भांड्यात पाणी साठवले जाते. या पाणी साठवलेल्या भांड्यात डासांची उत्त्पत्ती होते. यामुळे तापमानात बदलामुळे डास वाढतात परिणामी हिवतापाचा धोका वाढतो, अशी माहिती किटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community