महाराष्ट्रात दिवसेंदिवस उकाडा वाढत चालला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा वाढला असून, कोकणात सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीतही उन्हाचा तडाखा जाणवायला लागला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, येत्या 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यातील भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. तसेच येथील तापमान 42 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.
उकाडा अधिक वाढणार
रविवारी मार्च महिन्यातील सर्वाधीक तापमानाची नोंद करण्यात आली. 40 अंश तापमानाची रविवारी नोंद करण्यात आली आहे. कोकणातील काही शहरांमध्येही तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. त्यामुळे शक्यतो दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडू नका, चेहरा झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा, भरपूर पाणी प्या, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मार्च 30,31 दरम्यान विदर्भात व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीची शक्यता, तापमान 42° च्या वर जाण्याची शक्यता.
IMD GFS Model guidance given below, Will update.. pic.twitter.com/c8a84OzzUs— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 28, 2021
( हेही वाचा: धक्कादायक! इमारतीतील बंद गाळ्यात आढळले मानवी मृतदेहाचे अवशेष )
…म्हणून वाढतोय उकाडा
मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते. ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गरम व कोरड्या उत्तर पश्चिम वाऱ्यामुळे मुंबईत उष्णता वाढत आहे. पुढील काही दिवस उकाडा असाच कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community