उत्तर पश्चिम भारताच्या बहुतेक भागांसह मध्य महाराष्ट्रात यंदा एप्रिल महिना तापदायक ठरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने गुरुवारी एप्रिल महिन्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला. त्यानुसार, संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग येथील एप्रिलच्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ७ टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : महागाई भत्ता तर मिळाला; राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय? )
हवामान विभागाची माहिती
तर मराठवाड्याचा दक्षिणेकडील काही भाग, विदर्भातील गडचिरोलीचा परिसर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सोलापूर दरम्यानच्या परिसरात कमाल तापमान सरासरी इतके राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
देशातील दक्षिण भारत, पूर्व भारताचा काही भाग, पूर्वोत्तर भारतलगतच्या भागात कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे.
Join Our WhatsApp Community