मंदिराचा पैसा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी वापरता येणार नाही; Madras High Court चा आदेश

30
मंदिराचा पैसा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी वापरता येणार नाही; Madras High Court चा आदेश
मंदिराचा पैसा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी वापरता येणार नाही; Madras High Court चा आदेश

मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) अलीकडेच ‘तमिळनाडू हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभागा’ला मंदिराच्या अतिरिक्त निधीतून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यास मनाई केली आहे. हे शॉपिंग कॉम्प्लेक्स अरुलमिघू नंदीश्‍वरम् तिरुकोइल मंदिराच्या (Arulmighu Nandiswaram Tirukoil Temple) भूमीवर मंदिराच्या पैशातून बांधले जात होते. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, मंदिरांना शक्य तितके खटल्यापासून दूर ठेवावे.

(हेही वाचा – Sarpanch Accident : संतोष देशमुखांनंतर परळीत आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू)

उच्च न्यायालयाने (Madras High Court) म्हटले आहे की, जर शॉपिंग कॉम्प्लेक्सला अनुमती दिली गेली, तर गुंतवणुकीवर परतावा, परवानाधारक/भाडेकरू यांना बेदखल करणे, थकबाकीदार भाडे वसूल करणे आणि अतिक्रमण रोखणे यासंबंधी गुंतागुंत निर्माण होऊ शकते. तसेच ‘मानव संसाधन आणि स्वच्छता कायद्या’नुसार, मंदिराचा अतिरिक्त निधी केवळ कलम ‘६६(१)’ किंवा कलम ‘३६ अ’ किंवा ‘कलम ३६ ब’ अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उद्देशांसाठीच वापरला जाऊ शकतो आणि इतर कोणत्याही हेतूसाठी नाही. व्यापारी संकुलाचे बांधकाम कोणत्याही श्रेणीत येत नाही. त्यामुळे हा निर्णय बाजूला ठेवावा.

शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाचा काही भाग आधीच पूर्ण झाला आहे आणि तो विनावापर वाया जाऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने आदेश दिला की, आतापर्यंत केलेल्या बांधकामाचा वापर गरिबांना अन्न देण्यासाठी केला जाऊ शकतो. या इमारतीचा वापर गरीब आणि गरजू हिंदूंचे विवाह करण्यासाठीही केला जाऊ शकतो. (Madras High Court)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.