घट बसणार, मंदिरे उघडणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय

त्यामुळे एकप्रकारे राज्यातील जनतेला देवीच पावली असे म्हणावे लागेल.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर राज्यातील काही व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. पण तरीही राज्यातील मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे भाविकांमध्ये सरकार विरुद्ध नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. पण याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे कोरोनाविषयक नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे एकप्रकारे राज्यातील जनतेला देवीच पावली असे म्हणावे लागेल.

(हेही वाचाः ‘या’ तारखेला वाजणार राज्यातल्या शाळांची घंटा! कुठल्या इयत्तांचे वर्ग सुरू होणार? वाचा)

मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत आपण निर्बंध शिथिल करत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. तोंडावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकांचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here