शक्तीपीठं, साईबाबा मंदिर, सिद्धिविनायक व इतर देवस्थानांत कसा मिळणार प्रवेश? जाणून घ्या एका क्लिकवर

मंदिरांत गर्दी टाळण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत.

120

राज्यात गुरुवार 7 ऑक्टोबरपासून मंदिरे आणि सर्व धार्मिकस्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घटस्थापनेच्या दिवशीच मंदिरांचे दरवाजे उघडणार असल्याने सर्व भाविकांमध्ये आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. पण तरीही कोविडचे सर्व नियम पाळण्याचे आदेश राज्य सरकारकडून मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे याची दखल मंदिर प्रशासनांनी घेतली असून, मंदिरांत गर्दी टाळण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक देवस्थानं ही जगभरात प्रसिद्ध आहेत. शिर्डीचे साईबाबा मंदिर संस्थान, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास तसेच पंढपूरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रशासनासह अनेक देवस्थानांनी दर्शनासाठीची नियमावली जाहीर केली आहे.

शक्तीपिठांचे असे घ्या दर्शन

नवरात्रोत्सवात देवीच्या साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. त्यामुळे गर्दी टाळून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देवीच्या मंदिर प्रशासनांकडून विशेष काळजी घेण्यात आली असून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

  • देवीभक्तांना कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री. अंबाबाईचे दर्शन ई-दर्शन पासद्वारे देण्याचा निर्णय मंदिर व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
  • यासाठी www.mahalaxmikolhapur.com या वेबसाईटवर ई-पासची सुविधा उपलब्ध असणार आहे.
  • बुधवार 6 ऑक्टोबरपासून या पासची नोंदणी सुरू होणार आहे.
  • 7 ते 13 ऑक्टोबर व 15 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 ते रात्री 9, तर 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत ई-पासद्वारे श्री. अंबाबाईचं दर्शन घेता येणार आहे.

तुळजापूर येथील आई तुळजाभवानीचे दररोज 15 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

  • कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या देवीभक्तांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
  • डोस न घेतलेल्या भाविकांची मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

माहूरच्या रेणुकामातेच्या मंदिरात देखील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

मुंबईतील महालक्ष्मीच्या मुखदर्शनासाठी

  • www.mahalakshmitemplemumbai.com या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.
  • तसेच 022-23538901 या क्रमांकावरही नोंदणी करता येणार आहे.
  • मोबाईलवरील मेसेज दाखवूनच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करता येईल.
  • पूजेचे साहित्य, हार फुले स्वीकारले जाणार नाहीत.
  • प्रसादही दिला जाणार नाही.
  • मंदिर पहाटे 6 ते रात्री 9 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असेल.

प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात केवळ नोंदणी केलेल्या भाविकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

  • त्यासाठी मंदिराच्या मोबाईल अॅपद्वारे नोंदणी केल्यानंतर एक क्यू-आर कोड देण्यात येईल.
  • हा क्यू-आर कोड दाखवूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
  • प्रत्येक तासाला केवळ 250 भाविकांनाच क्यू-आर कोड दाखवून मंदिरात प्रवेश करता येईल.
  • दर गुरुवारी दुपारी 12 वाजता मंदिर न्यासाकडून अॅपवर दर्शनासाठी मर्यादित क्यू-आर कोड दिले जातील.
  • ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळीच भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
  • हार, फुले, नारळ तसेच इतर पूजेचे साहित्य घेऊन येणा-या नागरिकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही.
  • कोविडविषयक त्रिसूत्रींचे दर्शनावेळी पालन करणे बंधनकारक आहे.
  • लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांनी शक्यतो दर्शनासाठी येणे टाळावे.

शिर्डीच्या साईबाबा मंदिरात नेहमीच बाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांचा सागर लोटतो.

7 ऑक्टोबरपासून मंदिर सुरू करण्याबाबत मंदिर संस्थानाकडून नियम जारी करण्यात आले आहेत.

  • साईबाबांचा दरबार गुरुवारी पहाटेच्या काकड आरतीने सुरू होईल.
  • मंदिर पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत दर्शनासाठी भाविकांना खुले असणार आहे.
  • दररोज केवळ 15 हजार साईभक्तांनाच दर्शनाचा लाभ घेता येईल.
  • यात 5 हजार भाविकांना 5 दिवस अगोदर ऑनलाईन सशुल्क व निःशुल्क पास आरक्षित करता येणार आहेत.
  • एका आरक्षणावर चार भाविकांना दर्शन घेता येईल.
  • भाविकांना राहण्यासाठी भक्तनिवास खुले करण्यात आले आहेत.
  • मुखदर्शनाची सोय सुरू करण्यात आली आहे.
  • प्रसादालय आणि गुरुवारची पालखी मात्र सध्या बंद असणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.