मध्य रेल्वेच्या मुंबई, पुण्यासह इतर स्थानकांवर तात्पुरती Platform Tickets विक्री बंद; हे आहे कारण

108
मध्य रेल्वेच्या (Central Railway) प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्यासाठी मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध (Temporary restrictions on platform ticket sales) टाकण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन (Central Railway Congestion Management) आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे हे या निर्बंधाचे उद्दिष्ट आहे. हे प्लॅटफॉर्म तिकिट विक्रीचे निर्बंध २९ डिसेंबर ते ०२ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.  (Platform Tickets)
वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने सदर निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे. वर्षअखेरीच्या कालावधीत सुरळीत व सुरक्षित प्रवास अनुभवासाठी प्रवाशांनी (train passengers) त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे ही विनंती करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Global Temperature: 2024 ठरले सर्वात उष्ण वर्ष; 3700 हून अधिक लोकांचा झाला मृत्यू)



१४ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट निर्बंध लागू 
१.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
२.दादर
३.लोकमान्य टिळक टर्मिनस
४.ठाणे
५.कल्याण
६.पनवेल
७.पुणे
८.नागपूर
९.नाशिक रोड
१०.भुसावळ
११.अकोला
१२.सोलापूर
१३.कलबुर्गी
१४.लातूर

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.