Mira Road येथील ‘त्या’ सोसायटीत पुन्हा तणाव; Mohsin Sheikh ने कुर्बानीसाठी बकरी आणल्याने रहिवासी संतप्त

शनिवारी, 15 जूनच्या रात्री उशिरा Mira Road येथील सोसायटीतील रहिवासी मोहसीन शेख आणि काही कुटुंबांनी इदला कुर्बानी देण्यासाठी बकरे सोसायटीत आणले. या वेळी स्थानिक रहिवाशांनी विरोध केला.

13966
Mira Road येथील 'त्या' सोसायटीत पुन्हा तणाव; Mohsin Sheikh ने कुर्बानीसाठी बकरी आणल्याने रहिवासी संतप्त
Mira Road येथील 'त्या' सोसायटीत पुन्हा तणाव; Mohsin Sheikh ने कुर्बानीसाठी बकरी आणल्याने रहिवासी संतप्त

बकरी ईदच्या (Bakrid) पार्श्वभूमीवर मीरा रोड (Mira Road) येथील जे. पी. नॉर्थ सेलेस्ट या उच्चभ्रू सोसायटीत मुंबईच्या सोसायटीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. मोहसीन शेख (Mohsin Sheikh) या रहिवाशाने यंदाही सोसायटीत बकरी आणल्यामुळे इतर रहिवाशांनी या ओंगळवाण्या प्रकाराविरोधात संपप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदा ईद १७ जून रोजी आहे.

(हेही वाचा – Kalina land Case : Chhagan Bhujbal यांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश)

सोसायटीत कुर्बानी देण्यास स्थानिकांचा विरोध

शनिवारी, 15 जूनच्या रात्री उशिरा सोसायटीतील रहिवासी मोहसीन शेख आणि काही कुटुंबांनी इदला कुर्बानी देण्यासाठी बकरे सोसायटीत आणले. या वेळी स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. या वेळी बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनीही येऊन संबंधितांना समज दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उच्चभ्रू सोसायटीत बकरे आणल्याचा प्रकार समोर आला आहे.

सोसायटीतील अन्य रहिवाशांना पॉश सोसायटीत बकरे आणणे आणि त्यांची कर्बानी देण्याचे प्रकार संतापजनक वाटतात. मोहसीन शेख याने गेल्या वर्षीही अशाच प्रकारे बकऱ्या आणल्या होत्या. तेव्हाही मोठा वाद निर्माण झाला होता. त्या अनुभवातून यंदा सोसायटीकडून आधीच वाहनांची तपासणी केली जात होती. त्या वेळी मोहसीन शेखच्या गाडीची झडती घेतली असता पुन्हा बकरे आणल्याचा प्रकार उघड झाला. या वेळी स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लोकांना शांत केले. सध्या या सोसायटीत शांततापूर्ण तणाव आहे.

या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर सोसायटीच्या व्यवस्थापनाने तेथील परिसरात बकऱ्यांच्या कत्तलीवर बंदी घालणारी नोटीस जारी केली आहे. तसेच रहिवाशांना एकमेकांच्या हक्कांचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.