महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३ या कालावधीमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे आणि २ मार्च ते २५ मार्च २०२३ या दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाऊ शकतो. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे.
( हेही वाचा : पावसामुळे भाज्यांची आवक घटली; दर ४० टक्क्यांनी वाढले)
दहावी व बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर
www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात दिले जाणारे वेळापत्रकच अंतिम असणार आहे.
- दहावी : २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०२३
- बारावी : २ मार्च ते २५ मार्च २०२३