Terrace Hoarding : गच्चीवरील होर्डिंगवर कधी होणार कारवाई?

मुंबई महापालिकेच्या बी, सी आणि डी या दक्षिण मुंबईतील बऱ्याच इमारती या १९४० पूर्वीच्या असून त्यातील काही इमारती या रोड बेरिंग स्वरूपाच्याही आहेत.

821
Terrace Hoarding : गच्चीवरील होर्डिंगवर कधी होणार कारवाई?
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईत १०२५ जाहिरात फलक (होर्डिंग) असून त्यातील सुमारे ३५० ते ४०० होर्डिंग्ज हे इमारतींच्या गच्चीवर बसवलेली आहेत. मात्र, गच्चीवरील होर्डिंग्ज ही मुंबईतील मोठी समस्या असून घाटकोपर वरील होर्डिंग दुर्घटनेनंतर इमारतीच्या गच्चीवरील होर्डिंग्जचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे इमारतीच्या गच्चीवरील जाहिरात फलक पडून दुर्घटना घडल्यास मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती वर्तवली जात आहे. (Terrace Hoarding)

मुंबई महापालिकेने २०१४मध्ये झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेनंतर याप्रकरणी ज्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवून पोलिस कारवाई करण्यात आली, यातून सावध होत महापालिकेच्या परवाना विभागाने इमारतीच्या गच्चीवरील जाहिरात फलकांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एकाही इमारतींच्या गच्चीवर होर्डिंग लावण्यास परवानी दिली जावून नये तसेच परवान्याचे नुतनीकरण करण्यात येऊ नये अशाप्रकारचा निर्णय महापालिकेच्या परवाना विभागाने घेऊन त्यानुसार परवान्याचे नुतनीकरण करण्यास मनाई केली होती. (Terrace Hoarding)

मात्र, महापालिकेने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात मुंबई होर्डिंग असोशिएशनने न्यायालयात धाव घेतली आणि या निर्णयाला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेने विद्यमान गच्चीवरील होर्डिंगच्या परवान्याचे नुतनीकरण नियमानुसार करून नवीन इमारतींच्या गच्चीवर नव्याने होर्डिंगना परवानगी देण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे मुंबईत आज नव्याने एकही जाहिरात फलक इमारतीच्या गच्चीवर लागत नसले तरी आजही मुंबईतील जुन्या इमारतींसह अनेक इमारतींच्या गच्चीवर ३ ५० ते ४०० जाहिरात फलक लावलेले आहेत असल्याची आकडेवारी महापालिकेच्या परवाना विभागाच्या दप्तरी आढळून येत आहे. (Terrace Hoarding)

(हेही वाचा – Ghatkopar Hoarding Accident : मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करा; महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश)

होर्डिंगवर तात्काळ कारवाई करण्याची गरज

मुंबई महापालिकेच्या बी, सी आणि डी या दक्षिण मुंबईतील बऱ्याच इमारती या १९४० पूर्वीच्या असून त्यातील काही इमारती या रोड बेरिंग स्वरूपाच्याही आहेत. परंतु त्यामुळे या इमारतीच्या गच्चीवर जाहिरात फलक लावल्यास हवेच्या झोक्यामुळे ते खाली कोसळू शकते. आणि पर्यायाने मोठी जीवितहानी होतानाच इमारतीच्या बांधकामालाही धोका पोहोचू शकतो, अशा प्रकारची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. त्यामुळे घाटकोपर दुर्घटनेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इमारतींच्या गच्चीवर असणाऱ्या होर्डिंगवर तात्काळ कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तीस वर्ष जुन्या इमारतीच्या गच्चीवर परवानगी न देण्याची अट असली तरी अनेक इमारतींवर जी होर्डिंग आहेत, त्या इमारतींचे आयुर्मान ३० वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे. तसेच नवीन इमारतींच्या बांधकामामध्ये त्यावर होर्डिंग बसवले जाईल या अनुषंगाने पायाचे बांधकाम केले जात नाही. त्यामुळे नव्याने बांधलेल्या इमारतींच्या गच्चीवर होर्डिंगला परवानगी दिली जात नाही. (Terrace Hoarding)

मात्र, गच्चीवरील होर्डिंगबाबत न्यायालयाचे स्थगिती आदेश असल्याने पंतनगर येथील होर्डिंगच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या होर्डिंगच्या प्रश्नाकडे गंभीरपणे पहाण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इमारतींच्या गच्चीवरील होर्डिंग कोसळल्यास त्यामुळे मोठी जीवितहानी तर होणारच, पण त्यामुळे इमारतींच्या बांधकामालाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे गच्चीवर सध्या असलेले सर्व होर्डिंग न्यायालयातील स्थगिती उठवून तात्काळ हटवण्याची कार्यवाही महापालिकेने हाती घ्यावी अशाप्रकारची भावना महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Terrace Hoarding)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.