पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात ‘एस’ वळणावर रविवारी, 22 सप्टेंबर रोजी भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव कंटेनरने पुढील आठ गाड्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या विचित्र अपघातात सात कार व एका रिक्षाचा चुराडा झाला, यामध्ये पाच जण जखमी झाले. या अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
वाहतूक ठप्प
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या तीव्र उतारावरून कंटेनर चालकाचा ताबा सुटला. यामुळे कंटेनरने पुढे चाललेल्या आठ वाहनांना जोरदार धडक दिली. त्यामुळे ही वाहने एकमेकांना धडकली. वास्तविक रविवारची सुटी असल्यामुळे महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. अपघाताची (Accident) माहिती मिळताच खंडाळा पोलिस तातडीने घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून गेले. अपघातातील (Accident) वाहने महामार्गावरून बाजूला करेपर्यंत पाठीमागे वाहन चालकांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यातून वाहनांना मार्ग काढताना अडचण येत होती. बोगद्यापर्यंत वाहनांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी खूप कसरत करावी लागली.
Join Our WhatsApp Community