आजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळ, पश्चिम बंगाल येथे राजरोसपणे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दहशतवादी ठार करत असतात, हे सत्र आता जम्मू-काश्मीरमध्येही सुरु होणार का, असे चित्र निर्माण झाले आहे. कारण या ठिकाणी संघाच्या पदाधिकाऱ्यांची यादीच दहशतवादी संघटनेने तयार केली असून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे.
भारताच्या सर्वांगीण कल्याणासाठी, भारताचे पुनरुत्थान करण्यासाठी गेली अनेक दशके अविरत प्रयत्न करत असलेली संस्था म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. १९२५ ला एक व्यापक ध्येय ठेवून स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेचे अनुयायी, संस्थेच्या शाखा भारतभर परसलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी्च केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त केलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले काम नेटाने करत आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची “आम्ही हत्या करणार आहोत” अशी धक्कादायक माहिती एका कुप्रसिद्ध आतंकवादी संघटनेने जाहीर केली आहे.
कोणी धमकी दिली?
पाकिस्तानच्या जीवावर जगून भारतात उच्छाद घालत असलेल्या अनेक आतंकवादी संघटना कार्यरत आहेत. त्यातील द रेझिस्टंट फ्रंट या संघटनेने एक यादी जाहीर केली आहे, ज्यात पदाधिकाऱ्यांच्या नावासह त्यांचे पद, प्रदेश यांचा उल्लेख आहे. संघाच्या तब्बल ३० प्रादेशिक बड्या नेत्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.
मोहन भागवतांच्या भाषणाचा परिणाम?
१ एप्रिलला झालेल्या एका सभेला संबोधताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले होते की, सात दशके उलटून सुद्धा पाकिस्तानचे लोक अद्याप ही आनंदी नाहीत आणि पाकिस्तानी जनतेला आता वाटत आहे की, पूर्वी झालेली भारत-पाकिस्तानची फाळणी ही एक चूक होती. सभेत ते असं सुद्धा म्हणाले की, फाळणी झालेला भारत (सध्याचा भारत) हे एक दुख: स्वप्न आहे, तर अखंड भारत हे पूर्ण सत्य आहे.
अखंड भारत संकल्पना नेमकी आहे तरी काय?
सध्याचा भारत आणि अखंड भारत संकल्पनेतील भारत या दोहोंत सीमारेषेसह विचारप्रणाली आणि जीवनप्रणाली यांच्यात जमीन आस्मानाचा फरक आहे. अखंड भारतात सध्याच्या या शेजारील राष्ट्रांचा समावेश होतो:
पाकिस्तान
अफगाणिस्तान
नेपाळ
भूतान
म्यानमार
श्रीलंका
बांगलादेश
तिबेट
(हेही वाचा- लंडनमध्ये पुन्हा भारतीय विद्यार्थ्याची हिंदू म्हणून बदनामी; रश्मी सामंतनंतर करण कटारियांची मानसिक छळवणूक)
Join Our WhatsApp Community